निजिनो मत्सुबारा
Appearance
निजिनो मत्सुबारा (जपानी: 虹 の 松原) हे जपानच्या सागा प्रांतातील करात्सु शहराजवळील एक ३६० वर्षाचे पाइन झाडांचे वन आहे. हे वन म्हणजे ४०० - ७०० मीटर रुंद आणि सुमारे ४ किमी लांबीचा एक झाडांचा पट्टा आहे. याचे एकूण क्षेत्रफळ २४० हेक्टर आहे. या वनाला द ब्लॅक पाइन फॉरेस्ट ऑफ १ मिलियन ट्रीज असेही म्हणतात. परंतु हे नाव आता फारसे वापरात नाही.
मूळतः हे जंगल जुन्या काळचे सरंजाम तेराजावा हिरोताका यांनी कराट्सु खाडीतूने येणारा जोरदार वारा आणि लाटा थोपावण्यासाठी लावले होते. आज हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि जपानमधील १०० सर्वात सुंदर ठिकाणांच्या यादीमध्ये नोंदणीकृत आहे.
हे जंगल चिकुही लाइनमार्गे कराट्सू शहर आणि फुकुओका शहर या दोन्हीकडून सहजपणे पोहोचण्यायोग्य आहे. जवळपास राहण्यासाठी बरीच हॉटेल आहेत.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- योकाटोको (in Japanese)