निखिल रत्नपारखी
Appearance
(निखील रत्नपारखी या पानावरून पुनर्निर्देशित)
निखिल रत्नपारखी | |
---|---|
जन्म | निखिल रत्नपारखी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | टॉम आणि जेरी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | माझा होशील ना |
पत्नी | भक्ती रत्नपारखी |
निखिल रत्नपारखी हे एक मराठी नाट्यलेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि अभिनेते आहेत. टॉम आणि जेरी हे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या नाटकाचे नाव. या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात १० ऑगस्ट २०१३ रोजी झाला.
कारकीर्द
[संपादन]निखिल रत्नपारखी हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांनी प्राथमिक शाळेत सर्वप्रथम नाटकात काम केले. त्यानंतर कॉलेजला असताना रत्नपारखींनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतही नाटके केली. त्यांच्या गटाने १९९३ साली केशवराव दाते पुरस्कार जिंकला होता. पुढे ते समन्वय संस्थेतर्फेही पुण्यात नाटके करू लागले.
निखिल रत्नपारखी यांनी सुरुवातीला मुंबईत जाहिरातीच्या क्षेत्रात कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम केले. पुढे ते जाहिरातींमध्ये व्यक्तिशः भूमिका करू लागले. आता ते जाहिराती, सिनेमा, दूरचित्रवाणी मालिका तसेच व्यावसायिक रंगभूमीवरही काम करतात.
नाटके
[संपादन]- बेगम मेमरी आठवण गुलाम
- टॉम आणि जेरी
पुरस्कार
[संपादन]- ’मिफ्टा’चे पाच पुरस्कार (’टॉम आणि जेरी’साठी) (२०१३)
- दोन ’मटा’ सन्मान पुरस्कार (२०१३)
- महाराष्ट्र सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे (तीन लाखाचे) बक्षीस (२०१३)