निक्कोलॉ रिदॉल्फी
निक्कोलॉ रिदॉल्फी (१५०१ - ३१ जानेवारी, १५५०) सोळाव्या शतकातील एक इटालियन कार्डिनल होता.
रिदॉल्फीचा जन्म फिरेंझे शहरात पिएरो रिदॉल्फी आणि काँतेस्सिना दि लॉरेंझो दे मेदिची यांचा घरी झाला. काँतेस्सिना ही लॉरेन्झो दे मेदिची याची मुलगी होती). रिदॉल्फ कुटुंब स्वतःही श्रीमंत आणि प्रतिष्ठित होते. पोप लिओ दहावा हा निकोलोचा मामा होत आणि त्याने रिदॉल्फीला चर्चमध्ये भराभर बढत्या दिल्या. वयाच्या १३व्या वर्षीच त्याला पहिले पद दिले गेले.
रिदॉल्फीने आपल्या इतर नातेवाईकांप्रमाणे कलाश्रय जोपासला. त्याच्याकडे पुस्तके, चित्रे आणि शिल्पकलेचा विस्तृत संग्रह होता. निक्कोलॉच्या मृत्यूपश्चात हा संग्रबत्याचा भाऊ. लॉरेंझोकडे गेला. [१] रिदॉल्फीने बनवून घेतलेले एक मोठे कलात्मक आणि उत्सवी भांडे फ्रांसच्या पाचव्या चार्ल्ससाठी केले गेले होते. हे सध्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे आहे [२]
संदर्भ
[संपादन]- ^ A Cultural Symbiosis: Patrician Art Patronage and Medicean Cultural Politics in Florence (1530-1610), (Klazina D. Botke, ed.) Leuven University Press, 2021, p. 118 आयएसबीएन 9789462702967
- ^ Wilson, Timothy. "Double-spouted armorial pitcher", Maiolica: Italian Renaissance Ceramics in the Metropolitan Museum of Art, MET, 2016. p. 160 आयएसबीएन 9781588395610