निकोलाएव्ह उत्तर जहाजबांधणी कारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निकोलाएव्ह उत्तर जहाजबांधणी कारखाना तथा ६१ कॉम्युनार्डच्या नावाचा जहाजबांधणी कारखाना किंवा सोवियेत जहाजबांधणी कारखाना क्रमांक २०० हा युक्रेनच्या मायकोलैव शहरातील नौकाबांधणी कारखाना आहे. इंगुल नदीवर काळ्या समुद्रापासून ८९ किमी (५५ मैल) आत असलेला हा कारखाना इ.स. १७८८मध्ये बांधण्यात आला. येथे अनेक बलाढ्य युद्धनौकांची बांधणी झाली. भारतीय आरमाराच्या राजपूत वर्गीय विनाशिका येथे बांधल्या गेल्या.