नारायण नागबळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नारायण नागबळी हा तीन दिवसांचा हिंदू धर्मातील एक विधी आहे जो केवळ नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे केला जातो. वस्तुतः हे नारायन बळी आणि नाग बळी नावाचे दोन एकामागे एक केले जाणारे दोन विधी आहेत. यातील नारायण बळी विधी अकाली मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या आत्म्यांना मुक्ती आणि गती देण्यासाठी तर नाग बळी हा साप (विशेषतः नाग) मारण्याच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो.[१]

विधी[संपादन]

प्रत्यक्षात, नारायण नागबळी या पूजनात दोन स्वतंत्र विधी असतात. यातील नारायण बळी भविकास तसेच त्याच्या कुटुंबीयास पूर्वजांच्या शापापासून मुक्त होण्यासाठी करतात, ज्याला पितृदोष असेही म्हणतात. तर नाग बळी हा एखाद्या व्यक्तीला, त्याने किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्याने साप मारल्याच्या पापापासून मुक्त होण्यासाठी करतात. अशी मान्यता आहे की, नारायण नाग बळी पूजन केल्याने, मृत आत्म्यांच्या अपूर्ण सांसारिक इच्छा पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे हयात व्यातीस संतती प्राप्ती किंवा संसारातील इतर त्रास कमी होऊ शकतो.

नारायण बळी पूजन हा एक अंत्यविधीचाच आहे ज्यामध्ये गव्हाच्या पिठाचा पुतळा एक व्यक्ती म्हणून वापरला जातो. याद्वारे, अतृप्त इच्छा असलेल्या आत्म्यांना आवाहन केले जाते. हे आत्मे गव्हाच्या पिठाचा पुतळ्यात प्रवेश करता आणि त्यांचा परत विधिवत अंत्यसंस्कार करून त्यांना पुढील सद्गती मिळवून दिली जाते. त्याचप्रमाणे, नागबली हा विधी अनवधानाने किंवा अनिच्छेने साप किंवा नाग मारण्याच्या पापांपासून मुक्त होण्यास मदत करतो.

नारायण नाग बळी पूजन केल्याने भूत पिशाच बाधा, व्यवसायात यश न मिळणे, आरोग्याच्या समस्या किंवा कुटुंबात शांतता नसणे, विवाहात अडथळे येणे इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे.

या विधीमध्ये नारायण बली आणि नागबली असे दोन महत्त्वाचे भाग असतात, जे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केले जातात. तिसरा दिवस गणेश पूजन, पुण्य वाचन आणि नाग पूजन या विधीसाठी राखीव आहे. गरुड पुराणातील ४० व्या अध्यायात या विधीची माहिती आहे. हा विधी फक्त महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर या हिंदू तीर्थक्षेत्रात केला जातो.[२]

नारायण बळी[संपादन]

नारायण बळी पूजा हा गरुड पुराणात वर्णन केलेला एक विधी आहे जो कुटुंबातील सदस्याच्या अनैसर्गिक मृत्यूच्या सर्व प्रकरणांमध्ये केला जातो. एखादी व्यक्तीचा अनैसर्गिकमृत्यू खालीलपैकी एका कारणाने होऊ शकतो :

  • उपासमार
  • प्राण्याद्वरे
  • अपघात
  • जाळून
  • शाप
  • साथीच्या रोगांमुळे किंवा इतर गंभीर आजारामुळे अकाली मृत्यू होणे
  • आत्महत्या,
  • डोंगर, झाड किंवा उंचीवरून पडणे,
  • पाण्यात बुडून,
  • हत्या/खून
  • साप चावणे,
  • विज पडून

हा विधी त्या मृत व्यक्तींसाठी देखील केला जातो ज्याने खूप पाप केले होते.[३] या व वरील सर्व लोकांसाठी अंत्यसंस्काराचा विधी, तर्पण, श्राद्ध किंवा अशौच पालन होत नाहीत.[४] नारायण बळीमध्ये हिंदू अंत्यसंस्कार प्रथेप्रमाणे तेरा दिवसांचे विधी तीन दिवसांत केले जातात. त्र्यंबेश्वर येथील यातील तज्ज्ञ व अनुभवी पुजाऱ्या करून हा विधी करून घेतला जातो. ब्रह्मा, विष्णू, शिव, यम आणि प्रेत यांना विविध पाच विधी अर्पण केले जातात. त्र्यंबकेश्वरबाहेर इतर कुठेही ब्रह्मदेवासाठी कोणतीही पूजा विधी होत नाही. पूजेच्या शेवटी अर्ध्या गौरीची चिता रचून अग्नी दिला जातो.[२]

नाग बळी[संपादन]

नाग बळी विधी हा नारायण बळी सारखाच आहे. फरक एवढाच की पिठाच्या मानवी शरीराऐवजी पिठापासून बनवलेला साप येथे वापरला जातो परंतु दोन्ही विधींचा उद्देश एकमेकास पूरक परंतु पूर्णपणे भिन्न आहेत.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bates, Crispin (Editor); Mio, Minoru (editor); Matsuo, Mizuho (author) (2015). Cities in South Asia. , pp.-9. London: Routledge. pp. 229–240. ISBN 978-1-138-83276-3. 15 November 2017 रोजी पाहिले.CS1 maint: extra text: authors list (link)
  2. ^ a b c Bates, Crispin (Editor); Mio, Minoru (editor); Matsuo, Mizuho (author) (2015). Cities in South Asia., pp.8-9. London: Routledge. p. 8. ISBN 978-1-138-83276-3. 15 November 2017 रोजी पाहिले.CS1 maint: extra text: authors list (link)
  3. ^ Garuda Purana 40. 4 - 12
  4. ^ Garuda Purana 40.31

बाह्य दुवे[संपादन]