Jump to content

नारायण डोहो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नारायण डोहो या गावाचे नांव नारायण ऋषी यांच्या नावावरून पडले अशी अख्यायिका आहे. गावातून लेडी नावाची नदी वाहते. ज्ञानेश्वरीमध्ये लेडी या शब्दाचा अर्थ "छोटा प्रवाह" असा दिलेला आहे. हे वाचल्यावर मला मोठी गमत वाटली.

गावाचे वैशिष्ठय म्हणजे श्री चांगदेव महाराज यांची जन्म व समाधी बाबतचे गूढ रहस्य. चांगदेव महाराजाचा जन्म गवळी गुरुजीच्या आडातील नाथ संप्रदायाच्या योगी पुरुषाने वाजविलेल्या पुंगीतून झाला. म्हणजेच ते अयोनीज होते. अशी पूर्वापार कथा सांगितली जाते. त्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे पंढरपुरामध्ये महाद्वाराची उभारणी हे होय.

हे गाव महानुभाव संप्रदायाचे तिर्थस्थळ होय. श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली अशी ही भूमी आहे.महानुभाव संप्रदायाची ग्रंथ संपदेतील तिर्थस्थळ यामध्ये याचा उल्लेख आढळतो. संपूर्ण महाराष्टातून अनेक पदयात्री श्री स्वामीच्या दर्शनासाठी येथे येत असतात.

बिटीश व स्वातंत्र्योत्तर काळात हे राजकिय, सामाजिक व आध्यात्मिक बाबतीत पुढालेले होते. श्री राजाराम मोराजी साठे यांनी 1929 पासून स्वातंत्र्य लढयात सहभाग घेऊन तीन वेळा कारावास भोगला. पंडीत नेहरु जेव्हा अहमदनगरच्या भुईकोट किल्यात स्थानबंध होते. तेव्हा राजाराम पाटिल ऊर्फ बुवा त्यांना जेवणाचे डब्बे पोहच करायाचे या वरूनच त्यांना खास विशेषण चिकटले होते.