नानजिंगची लढाई
Appearance
नानजिंगची लढाई ही १९३७मध्ये दुसऱ्या चीन जपान युद्धादरम्यान झालेली लढाई होती. या लढाईत जपानचा विजय होउन त्यांनी त्यावेळची चीनची राजधानी असलेले नानजिंग शहर काबीज केले. डिसेंबर १ ते १३ दरम्यान झालेल्या या लढाईनंतर जपान्यांनी शहरात घुसून नानजिंगची कत्तल केली. यात सुमारे दोन लाख चिनी सैनिक आणि नागरिकांची हत्या केली गेल्याचा अंदाज आहे.