Jump to content

नाझीवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वस्तिक हे नाझी पक्षाचे चिन्ह होते

नाझीवाद (राष्ट्रीय समाजवाद, इंग्लिश: Nazism, जर्मन: Nationalsozialismus) हा शब्द नाझी जर्मनीच्या नाझी पक्षाची धोरणे व विचारधारांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. नाझीझम हा फॅसिझमचाच एक प्रकार मानला जात असून त्यामध्ये वर्णद्वेष, ज्यूविरोध इत्यादी तत्त्वे देखील सामील होती. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून व कम्युनिस्ट-विरोधी विचारांमधून नाझीवादाचा उगम झाला. नाझीवादाचा भांडवलशाहीसाम्यवाद ह्या दोन्ही तत्त्वांना विरोध असून राष्ट्रीय एकात्मता व संस्कृतीवर आधारित एकसारखा समाज निर्माण करणे हे त्याचे ध्येय होते.

५ जानेवारी १९१९ रोजी वायमार प्रजासत्ताकामध्ये नाझी पक्षाची स्थापना झाली. पुढील काही वर्षांमध्ये ॲडॉल्फ हिटलरने नाझी पक्षावर संपूर्ण नियंत्रण केले व पक्षाच्या ज्यूविरोधी धोरणांचा प्रसार करण्यास सुरुवात केली. १९२४ सालच्या माइन काम्फ ह्या पुस्तकामध्ये हिटलरने नाझीवादाची तत्त्वे समजावली आहेत. नाझीवाद ही पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये उदयाला आलेली एक सर्वंकष स्वरूपाची विचार प्रणाली आहे जर्मनीचा तत्कालीन हुकुमशहा अडॉल्फ हिटलर याने नाझीवादाची मांडणी केलेले आहे