Jump to content

नागार्जुन (रसायनशास्त्रज्ञ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागार्जुन (इ.स. १० वे शतक) हे भारतातील धातुकर्मी व रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी रसरत्‍नाकर नामक रसग्रंथाची रचना केली होती.

नागार्जुन यांचा जन्म सन ९३१मध्ये गुजराथेतील सोमनाथजवळच्या दैहक(?) नावाच्या किल्ल्यावर झाला. लोकांना वाटे की ते देवदूत आहेत. त्यांची ही समजूत नागार्जुनांनी देवता व नागार्जुन यांच्यामधील संवादस्वरूपात लिहिलेल्या ’रसरत्‍नाकर’मुळे झाली होती. महाराष्ट्रातील अहमदनगरनजीक नागलवाडी या गावी नागार्जुनांच्या वास्तव्याच्या खुणा भारतीय पुरातत्त्व खात्यास सापडल्या आहेत. रसरत्‍नाकर या पुस्तकात आसवन (डिस्टिलेशन), द्रवण (लिक्विफिकेशन), संप्लवन (सब्लिमेशन) यां क्रियांचे वर्णन आहे. त्याव्यतिरिक्त नागार्जुनाने उत्तर तंत्रआरोग्यमंजिरी हे आयुर्वेदावरील ग्रंथ व कक्षपुत-तंत्र, योगसर, योगाष्टक ही पुस्तकेही लिहिली आहेत.