Jump to content

नागरिकत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागरिकत्व
relation, political concept, institution
उपवर्गmembership, identity संपादन
ह्याचा भागराज्य संपादन
चा आयामराज्य, मानवी हक्क संपादन
Foundational textमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संपादन
Main regulatory textEuropean Convention on Nationality, Convention on the Reduction of Statelessness संपादन

नागरिकत्व म्हणजे एखाद्या सार्वभौम राज राजकीय समुदायाचे सदस्यत्व आणि त्या राज्याशी असलेली निष्ठा होय.[१][a] जरी आजच्या इंग्रजी भाषक जगात नागरिकत्व ही संकल्पना बऱ्याचदा राष्ट्रीयत्वाशी जोडली जात असली,[३][४][५] तरी आंतरराष्ट्रीय कायदा सामान्यतः राष्ट्रीयत्वाचा उल्लेख करण्यासाठी 'नागरिकत्व' हा शब्द वापरत नाही;[६][७] या दोन्ही संकल्पना वैचारिकदृष्ट्या सामूहिक सदस्यत्वाचे भिन्न पैलू आहेत.[८]

सहसा नागरिकत्वाला मुदत नसते आणि ते व्यक्तींना त्या राजकीय व्यवस्थेत काम करण्याची, राहण्याची आणि मतदान करण्याची परवानगी देते, तसेच त्या राजकीय घटकाशी स्वतःची ओळख जोडण्याची आणि संभाव्यतः पारपत्र मिळवण्याची संधी देते. तथापि, मताधिकार हिरावून घेणे आणि थेट रंगभेद यांसारख्या भेदभावपूर्ण कायद्यांमुळे नागरिकांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवले गेले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, राज्यांमधील लोकसंख्या मुख्यत्वे प्रजा होती,[१] तर नागरिकत्व हा एक विशेष दर्जा होता, ज्याचा उगम शहरी लोकसंख्येच्या अधिकारांमध्ये झाला; जसे की विशेषतः प्राचीन नगर-राज्यांमधील, शहरांमधील आणि गणराज्यांमधील पुरुष नागरिकांचे अधिकार, ज्यातून सिव्हिटास आणि बुर्जुआजी किंवा नगरजन या सामाजिक वर्गाचा उदय झाला. तेव्हापासून राज्यांनी नागरिकत्वाचा दर्जा आपल्या बहुतांश राष्ट्रीय लोकांपर्यंत विस्तारित केला आहे, ज्यामध्ये नागरिक अधिकारांची व्याप्ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये भिन्न आढळते.

  1. 1 2 Leydet, Dominique (2006-10-13). "Citizenship". Stanford Encyclopedia of Philosophy (इंग्रजी भाषेत). 2023-10-03 रोजी पाहिले.
  2. ↑ Irving, Helen (2022). Allegiance, Citizenship and the Law: The Enigma of Belonging. Elgar Studies in Legal Theory (इंग्रजी भाषेत). Edward Elgar Publishing Limited. pp. 2–3. ISBN 978-1-83910-254-7.
  3. ↑ "Citizenship and Participation — Manual for Human Rights Education with Young people". Manual for Human Rights Education with Young people (इंग्रजी भाषेत). 2011-08-23. 2023-10-03 रोजी पाहिले.
  4. ↑ Votruba, Martin. "Nationality, ethnicity in Slovakia". Slovak Studies Program (इंग्रजी भाषेत). University of Pittsburgh. 2014-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-23 रोजी पाहिले.
  5. ↑ Nationality and Statelessness: A Handbook for Parliamentarians (PDF) (इंग्रजी भाषेत). UNHCR आणि IPU. 2005. 2020-07-16 रोजी पाहिले.
  6. ↑ "International Migration Law No. 34 - Glossary on Migration" (PDF). आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना (इंग्रजी भाषेत): 143–144. 2019-06-19. ISSN 1813-2278.
  7. ↑ Rütte, Barbara von (2022-12-19), "Citizenship and Nationality: Terms, Concepts and Rights", The Human Right to Citizenship (इंग्रजी भाषेत), Brill Nijhoff, pp. 11–57, ISBN 978-90-04-51752-3, 2023-11-27 रोजी पाहिले
  8. ↑ Sassen, Saskia (2002). "17. Towards Post-National and Denationalized Citizenship". In Isin, Engin F.; Turner, Bryan S. (eds.). Handbook of Citizenship Studies (इंग्रजी भाषेत). SAGE Publications. p. 278. ISBN 978-0-7619-6858-0. 2021-09-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-05-06 रोजी पाहिले.
  1. ↑ हेलेन अर्विंग यांनी नमूद केले आहे की 'निष्ठा' (allegiance) हा शब्द वैयक्तिक दृष्टिकोन दर्शवण्याऐवजी कायद्यांतर्गत स्थान दर्शवण्यासाठी 'नागरिकत्व' या शब्दाचा समानार्थी म्हणून वापरला जाऊ लागला, परंतु त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की नागरिकाच्या बाजूने राज्याविषयी असलेले हे उत्तरदायित्व दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचे ठरत आहे.[२]
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.