नाकीजिन किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाकीजिन किल्ला
今帰仁城
नाकीजिनम् ओकिनावा in जपान
२००५ मधील नाकीजीन किल्ल्याचे दृश्य
Coordinates 26°41′27″N 127°55′49″E / 26.69083°N 127.93028°E / 26.69083; 127.93028गुणक: 26°41′27″N 127°55′49″E / 26.69083°N 127.93028°E / 26.69083; 127.93028
प्रकार गुसुकु
जागेची माहिती
द्वारे नियंत्रित होकुझान (१३१४ – १४१६)
रियुक्यू राज्य (१४१६ – १८७९)
जपान (१८७९ – १९४५)
रियुक्यू बेटांचे युनायटेड स्टेट्स मिलिटरी गव्हर्नमेंट (१९४५ – १९५०)
रियुक्यू बेटांचे युनायटेड स्टेट्स मिलिटरी गव्हर्नमेंट (१९५० – १९७२)
जपान (१९७२ – सध्या)
सर्वसामान्यांसाठी खुले होय
परिस्थिती भग्न अवषेश
Site history
बांधले १४ व्या शतकाच्या सुरुवातीला
याने बांधले हानिजि
सध्या वापरात १४ वे शतक – 1609 (1609)
साहित्य रियुक्यूअन चुनखडी, लाकूड
युध्द होकुझानचे आक्रमण (१४१६)
रियुक्यूचे आक्रमण (१६०९)
किल्ल्यात ठेवलेली शिबंदी
मागील
कमांडर
शो कोकुशि
रहिवासी होकूझानचे राजे, होकुझानचे वॉर्डन, नाकीजीन मागीरीचे अजी

नाकिजीन किल्ला (今 帰 仁 ak नाकिजिन गुसुकु, कुनिगामी: नाचिजीन गुशिकु [१], ओकिनावान: नाचिजीन गुशिकु [२]) नाकीजिन, ओकिनावा येथे असलेला रियुकुआन गुसुकू प्रकारचा एक किल्ला आहे. तो सध्या मोडकळीस आलेला आहे. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात ओकिनावा बेटावर तीन राज्ये होते: दक्षिणेस नानझान, मध्य भागात चाझान आणि उत्तरेस होकुझान. नाकीजिन ही होकुझानची राजधानी होती. किल्ल्यामध्ये अनेक धार्मिक उटाकी चरांचा समावेश दिसून येतो, यामुळे असे कळते की हा किल्ला त्याकाळी धार्मिक कार्यांचे केंद्र होता. सध्या हा किल्ला हिकान चेरीसाठी प्रसिद्ध आहे. या चेरी उत्तर ओकाइनावामध्ये जानेवारीच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काळात उमलतात. जपानमध्ये दरवर्षी सर्वप्रथम चेरी येथेच फुलतात.

इतिहास[संपादन]

होकिझान राज्य निर्माण होण्याच्या आधी तेथे नाकीजिनचे सरदारांचे अस्तित्व होते. असे मानले जाते की नाकीजीन किल्ल्याचा गुसुकु प्रकार तेथेच उदयास आला आणि राज्याची स्थापना सुद्धा येथेच झाली. हा किल्ला मोटोबू द्वीपकल्पात, पूर्व चीन समुद्राच्या समोर असलेल्या खडकाळ जागेवर वसलेला आहे. हा किल्ला त्याच्या पूर्वेला असणाऱ्या एका ओहोळाने मोटोबूच्या मुख्य पर्वतापासून विभक्त केलेला आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे व ईशान्य दिशेला एक उतार आहे जो समुद्र किनाऱ्याकडे जातो. एके काळी इथे असणाऱ्या छोट्या बंदरातून किल्ल्याला रसद पुरवली जायची. होकिझान राज्याचे मुख्य बंदर असलेले उन्टेन बंदर याच्या पूर्वेस साधारणतः ५ ते ६ मैलांवर आहे.[३]

शाही निवासस्थान सर्वात उंच आणि आतील भागात स्थित होते आणि त्याच्या सभोवताली लहान बाग होती. या किल्ल्यातील पर्वताच्या सर्वात उंच ठिकाणी तीन देवळे (उगांजू) बांधलेली आहेत. शाही निवासस्थाणाच्या बाहेरील रिंगणात कमी उंचीच्या भिंती आहेत. त्या तटबंदीमध्ये प्रशासकीय इमारतींबरोबरच काही घोडेस्वारांसाठीचे निवासस्थान होते.[३] त्यावेळेसच्या गुसुकु बांधकाम प्रमाणांनुसार, भिंतींचे दगडी बांधकाम अगदी भक्कम होते, परंतु अचूकतेचा अभाव दिसून येतो. सुमारे १५०० मीटर लांब चुनखडीच्या भिंती अजूनही शिल्लक आहेत.[४]

इ.स. १४१६ मध्ये चोझान सैन्याने हल्ला करून नष्ट करण्यापूर्वी या किल्ल्याने राज्यकर्त्यांच्या तीन पिढ्या पाहिल्या होत्या. होकुझानचे राजे जपानच्या सम्राटच्या अधीन शुरी येथे राज्य करीत होते. ते बरेच शतके किल्ल्यावर रहात होते. इ.स.१६०९ मध्ये, जपानचे जहागीर डोमेन ऑफ सत्सुमा याने रियुक्यू राज्यावर आक्रमण केले. अमामी बेटांवर जोरदार झुंज दिल्यानंतर ते उन्टेन हार्बर येथील ओकिनावा बेटावर उतरले. त्यांनी नाकीजीन किल्ल्यावर जोरदार आक्रमण केले. यात दोन्ही बाजूच्या सैन्याची बरीच जिवितहानी झाली, परंतु शेवटी जपानी लोकांना विजय मिळाला आणि त्यांनी किल्ला जाळून टाकला.[५]

एक पर्यटन स्थळ म्हणून येथील पूर्व चीनच्या समुद्राचा सुंदर देखावा, किल्ल्याच्या भिंतींची भव्यता आणि किल्ल्याने व्यापलेली एकूण जागा प्रसिद्ध आहेत.[६] त्याकाळी जवळपासच्या बेटावर नानझान व चोझान सारखी ईतर राज्ये होती. होकुझानचे राज्य त्यांच्या मानाने बरेच मोठे होते. तसेच येथे लोकवस्ती कमी दाट होती आणि लोकसंख्याही कमी होती. प्रत्येक वर्षी चेरी ब्लॉसमर्स (सकुरा)चा बहर पाहण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी नाकीजीन देशातील पहिल्या स्थानांवर आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ナチヂングシーク". 今帰仁方言音声データベース (जपानी भाषेत).[permanent dead link]
  2. ^ "ナチジン". 首里・那覇方言音声データベース (जपानी भाषेत). Archived from the original on 2019-06-08. 2019-11-22 रोजी पाहिले.
  3. ^ a b Kerr, George H. Okinawa: the History of an Island People. Revised Ed. Tokyo: Tuttle Publishing, 2000. pp. 61-62.
  4. ^ "Nakijin-jô-seki Archived 2015-09-14 at the Wayback Machine.." Okinawa Konpakuto Jiten (沖縄コンパクト事典, "Okinawa Compact Encyclopedia"). Ryukyu Shimpo. 1 March 2003. Accessed 29 September 2009.
  5. ^ Turnbull, Stephen. The Samurai Capture a King: Okinawa 1609. Oxford and New York: Osprey Publishing, 2009. Pages 32-37.
  6. ^ Kadekawa, Manabu. "Nakijin-jô-seki." Okinawa Chanpurû Jiten (沖縄チャンプルー事典, "Okinawa Champloo Encyclopedia"). Tokyo: Yamatokei Publishers, 2003. p55.

बाह्य दुवे[संपादन]