नवयान (प्रकाशन गृह)
नवयान हे आंबेडकरी विचारांवर जोरदार प्रभाव असलेले नवी दिल्लीतील एक स्वतंत्र जातिविरोधी भारतीय प्रकाशन गृह आहे. एस. आनंद आणि डी. रविकुमार यांनी २००३ मध्ये याची स्थापना केली होती. या प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक आंबेडकर : ऑटोबायोग्राफिक नोट्स होते, ज्याची किंमत ४० रुपये इतकी होती. तेव्हापासून या प्रकाशनाने कल्पित कथा, नॉन-फिक्शन, ग्राफिक कादंबऱ्या आणि काव्ये-कविता प्रकाशित केल्या आहेत. २००९ पासून, नवयानाने जातीव्यतिरिक्त इतर सामाजिक विषयांचा समावेश करण्यासाठी आपला प्रकाशनाचा परिप्रेक्ष्य वाढविला, कारण 'जातिविरुद्धचा संघर्ष हा न्याय आणि समानतेसाठीच्या इतर संघर्षांपासून वेगळा राहू शकत नाही' असे प्रकाशनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या निवेदनात म्हणले आहे.[१]
वार्षिक व्याख्याने
[संपादन]नवायनाने पहिल्या वार्षिक व्याख्यानांचे आयोजन केले होते. त्या योजनेनुसार स्लोव्हेनियन मार्क्सवादी तत्त्ववेत्ता स्लाव्होज आयक यांनी नवी दिल्ली, कोचीन आणि हैदराबाद येथे प्रेक्षकांसाठी भाषणे केली होती.[२]
पुरस्कार
[संपादन]नवयानाचे संस्थापक एस. आनंद यांना २००७मध्ये इंटरनॅशनल यंग पब्लिशिंग आंत्रेप्रेन्युअर ॲवॉर्ड मिळाले.[३]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ http://navayana.org
- ^ Atluri, Tara. "Mild Curry, Mildly Queer: India, Sex, and Slavoj Žižek". International Journal of Zizek Studies. 4 (4). 29 April 2018 रोजी पाहिले.
- ^ "Young Publishing Entrepreneur Award". 2011-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 September 2014 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]अधिकृत वेबसाइट, नवयान पब्लिशिंग