नवप्रभा
Appearance
| नवप्रभा | |
|---|---|
| प्रकार | दैनिक |
| मालक | धेंपो उद्योगसमूह |
| संपादक | परेश प्रभू |
| स्थापना | १९७० |
| भाषा | मराठी |
| मुख्यालय | दैनिक नवप्रभा, नवहिंद भवन, पणजी, गोवा, भारत |
| | |
| संकेतस्थळ: http://www.navprabha.com/ | |
दैनिक नवप्रभा हे गोव्यातील प्रतिष्ठित मराठी दैनिक आहे. द्वा.भ. कर्णिक, शांताराम बोकील, तुकाराम कोकजे, लक्ष्मीदास बोरकर, सुरेश वाळवे हे याचे माजी संपादक होते. गेली 15 वर्षे श्री. परेश प्रभू हे या दैनिकाचे संपादक आहेत. गोव्यातील हे एक प्रतिष्ठित दैनिक आहे. 1970 साली त्याची सुरुवात झाली. 2020 मध्ये त्याने आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्या निमिताने 'नवप्रभा एक सोनेरी प्रवास' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला असून त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे शुभेच्छा संदेश, तसेच गेल्या पन्नास वर्षांतील गोव्यातील घटना घडामोडींचे वार्तांकन आहे.