Jump to content

नमुरचा बालेकिल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नामूरचा सिटाडेल, समोर दिसणारी मीयूझ नदी आणि त्यानंतर वॉलोनियाची संसद

नमुरचा सिटाडेल हा एक किल्ला आहे. नमुर बेल्जियमच्या वालून क्षेत्राची राजधानी आहे. येथे सांब्रे आणि मियुझ नद्यांचा संगम होतो. हा रोमन काळापासून आहे. परंतु बऱ्याच या सिटाडेलची पुनर्बांधणी केली गेली. सद्यस्थितीचे डिझाईन मेन्नो व्हॅन कुहॉर्न यांनी बनवले होते. याला १६९२ च्या वेढ्यानंतर वौबन तर्फे सुधारण्यात आले. ही वास्तु वॉलोनियाच्या मेजर हेरिटेज साइट म्हणून वर्गीकृत केलेली आहे. याची सर्वात उंच जागा १९० मीटर आहे.

याचा मुळ किल्ला स.न. ९३७ मध्ये बांधला गेला होता. हे शहर डच लोकांच्या ताब्यात असताना १६३१ ते १६७५ च्या दरम्यान या शहराला वैभव प्राप्त झाले. सध्याची रचना जवळच १५४२ मध्ये बांधलेल्या छोट्या किल्ल्यापासून वेगळा करणाऱ्या विभागाला "टेरा नोवा" असे नाव दिले आहे. १८ व्या शतकामध्ये विविध प्रकारच्या सहाय्यक ईमारती बांधण्यात आल्या. स.न. १८९१ मध्ये हा सिटाडेल सैन्याच्या हालचालींमधून वगळण्यात आला. नमुरच्या आसपासच्या किल्ल्यांच्या रचनेमुळे हे शहर तोफखानाच्या हल्ल्यापासून बचावले. हा सिटाडेल आर एफ एन कमांड पोस्टसाठी वापरण्य्यात येतो.[१]

दीनांत, हुई आणि लीज यांच्याबरोबर मिळुन, नामूरचा सिटाडेल, तथाकथित म्यूसेस किल्ल्यांचा एक भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Puelinckx, Jean; Malchair, Luc. "Citadelle de Namur". Index des fortifications belges (French भाषेत). fortiff.be. Archived from the original on 2017-07-31. 20 August 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]