नगरपारकर जैन मंदिर
नगरपारकर जैन मंदिर | |
---|---|
गोरी मंदिर, नागरपारकर | |
स्थान | सिंध प्रांत, पाकिस्तान |
नगरपारकर जैन मंदिरे हे पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध प्रांतात नगरपारकर जवळील भागात आहेत. हा परित्यक्त जैन मंदिरांचा गट आहे आणि मंदिरांच्या स्थापत्य शैलीने प्रभावित एक मशिद देखील आहे. ते १२व्या ते १५व्या शतकात बांधले गेले होते जेव्हा मानले जाते की जैन वास्तुकला शिगेला हिती. इ.स. २०१६ मध्ये या संपूर्ण परिसराला जागतिक वारसा स्थानच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केले गेले.[१][२][३]
मंदिर
[संपादन]संपूर्ण प्रदेशात सुमारे १४ जैन मंदिरे विखुरलेली आहेत, त्यातील काही प्रमुख आहेत; गोरी मंदिर, बाजार मंदिर, भोडेसर मंदिर आणि वीरवाह जैन मंदिर.
गोरी मंदिर
[संपादन]वीरवाहा मंदिराच्या वायव्य दिशेला सुमारे १४ मैलांवर गोरी मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १३७५-७६ मध्ये गुजराती शैलीमध्ये बांधले गेले. यात ५२ इस्लामिक शैलीचे घुमट आणी ३ मंडप आहेत. मंदिर ४० फूट रुंद आणि १२५ फूट लांब आहे आणि संगमरवराने बनलेले आहे. संपूर्ण मंदिर एका उंच व्यासपीठावर बांधले गेले आहे आणि दगडी पायऱ्या आहेत. मंदिराच्या आतील बाजूस संगमरवरी खांबाचे सुरेख कोरीवकाम आहे. मंदिरात प्रवेश करणारा मंडप जैन पुराणकथांचे प्रतिनिधित्व करणारे चित्रांनी सजवले गेले आहे. गोरी मंदिरातील भिंतीवरील चित्रकला भारतीय उपखंडाच्या उत्तर भागात सर्वात प्राचीन जैन भिंतीवरील चित्रकला आहे. संपूर्ण मंदिरात २४ लहान कोठारे सापडली आहेत, जे जैन धर्माच्या २४ तीर्थंकरांचे प्रतिनिधित्व करतात.
बाजार मंदिर
[संपादन]बाजार मंदिर नगरपारकर शहरातील मुख्य बाजारपेठेत बांधले गेले आले. मंदिर जटिल कोरीव काम आणि शिल्पकलेसाठी उल्लेखनीय आहे. मंदिराची मुख्य इमारत, मुख्य कळस व कमानीची रचना पूर्णपणे अजुनही अखंड आहे. इ.स. १९४७ मध्ये भारत-पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापर्यंत आणि कदाचित त्यानंतरही काही वर्षांनी या म्ंदिराचा उपयोग झाला आहे.
भोडेसर मंदिर
[संपादन]नगरपारकरपासून ४ मैलांवर भोडेसर तेथे तीन जैन मंदिरांचे अवशेष आहेत. भोडेसर ही सोढा राजवटीत या प्रदेशाची राजधानी होती. तीनपैकी दोन मंदिरे प्राण्यांच्या छत्राच्यारूपात वापरली गेली, तर तिसऱ्या मंदिराच्या मागील भागाच्या जीर्णतेचा उल्लेख इ.स. १८९७ च्या कागदपतत्रांमध्ये झाला आहे. येथे एक प्राचीन पाण्याची टाकी असून, भोडेसर तलाव म्हणून ती ओळखली जाते. इथले सर्वात प्राचीन मंदिर पोनी दहरो नावाच्या जैन महिलेने ९व्या शतकाच्या आसपास बांधले होते. हे शास्त्रीय शैलीमध्ये कोणत्याही सिमेंट किंवा चुन्याशिवाय दगडांनी बांधले गेले होते. हे एका उंच व्यासपीठावर बांधले गेले आहे. यात प्रचंड दगडी खांब आणि इतर संरचनात्मक घटक आहेत. उर्वरित भिंती अस्थिर आहेत आणि अर्धवट कोसळल्या आहेत. स्थानिक लोकांनी इमारतीच्या काही भागांचे तुकडे तुकडे केले होते, आणि त्या विटा घरे बांधण्यासाठी वापरल्या आहेत. आणखी दोन जैन मंदिरांचा निर्माण इ.स. १३७५ आणि इ.स. १४४९ मध्ये झाला होता.
वीरवाह मंदिर
[संपादन]वीरवाहा मंदिर नगरपारकाराच्या उत्तरेस १५ मैलांवर वीरवहा शहराजवळ आहे. ही जागा कच्छच्या रणच्या काठावर असलेल्या "परिनगर" नावाच्या प्राचीन बंदराच्या अवशेषांजवळ आहे. या भागात एकेकाळी तीन मंदिरे होती, ज्याची स्थापना जेसो परमार यांनी इ.स. ६५८ मध्ये केली होती. ब्रिटिश काळात पांढऱ्या संगमरवराने बनविलेले हे मंदिर आहे व ते चांगले जतन केले गेले आहे. दुसऱ्या मंदिरात संगमरवरी विभागातील बारीक कोरीव काम होते जो ब्रिटिश काळात पाकिस्तानच्या राष्ट्रीय संग्रहालयात कराचीमध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. तिसऱ्या अवशेष मंदिरात १४ फूट व्यासाच्या मोठ्या मध्यवर्ती घुमटाभोवती २४ लहान घुमट आहेत. मध्यवर्ती घुमटात दगडाच्या बारीक चिन्हे आहेत. जवळच रस्ता बनविताना कामगारांना चुकून अनेक जैन पुतळे सापडले, ज्या स्थानिकांनी उर्वरित मंदिरात ठेवले, तर काहींना उमरकोटमधील संग्रहालयात नेले गेले.
मशिद
[संपादन]भोडेसरची पांढरी संगमरवरी मशिद आसपासच्या जैन मंदिरांच्या वास्तूने प्रभावित अशा शैलीने बनविली आहे. इ.स. १५०५ मध्ये गुजरातच्या सुलतान महमूद बेगडा यांनी ही मशिद बांधली होती. मशिदीच्या आसपासच्या जैन मंदिरांवरील घुमट्यांप्रमाणेच मध्यवर्ती घुमट आहे आणि चौरस आकाराची इमारत असून त्याच्या प्रत्येक बाजू ९.२ मीटर आहेत. मशिदीचे स्तंभ देखील जैन वास्तुकला प्रतिबिंबित करतात, तर छताच्या काठाचे सजावटीचे घटक देखील जैन मंदिरांनी प्रेरित आहे.
चित्र
[संपादन]-
गोरी मंदिर
-
बाजार मंदिर
-
बाजार मंदिरातील चित्रकारी
-
नक्षीकाम
-
बाजार मंदिरातील चित्रकारी
-
गोरी मंदिर
-
गोरी मंदिर
-
भोडेसर मशिद
संदर्भ
[संपादन]- ^ "Nagarparkar Cultural Landscape". UNESCO World Heritage Site. 13 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "Vanishing temples of Thar and Nagar Parkar". Things Asian. ३ नोव्हेंबर २०१६. 13 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "Secrets of Thar: A Jain temple, a mosque and a 'magical' well". Dawn. ३० जुलाई २०१६. 13 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)