धूसर खंड्या पंकोळी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धूसर खंड्या पंकोळी (इंग्लिश:Dusky Crag Martin) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो. त्याची शेपटी आखूड व चौरस असते. त्याचे पंख व उडण्याची पद्धत कन्हईसारखी असते. शेपटीची मधली व शेवटची पिसे सोडली तर बाकीच्या पिसांवर गोल पांढरे ठिपके दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. त्यांचा आवाज चीट-चीट असा असतो.

वितरण[संपादन]

धूसर खंड्या आसाम हे राज्य सोडले तर भारतात सर्व राज्यात पाहायला मिळतो.

निवासस्थाने[संपादन]

हा साधारणतः पर्वत व पर्वतशिखरे यावर निवास करतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली