Jump to content

धुमारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धुमारे हे वनस्पतीच्या पानाच्या बेचक्यातून फुटणारे एक प्रकारचे खोड असते. ते जमिनीशी समांतर वाढते व त्याच्या पेरावर नवीन झाड तयार होते. स्ट्रॉबेरी हे धुमाऱ्याद्वारे वाढणाऱ्या वनस्पतीचे उदाहरण. स्ट्रॉबेरीच्या झाडावर एका आड एक अशा पेरातून नवीन झाड तयार होते. त्या पेराच्या ठिकाणी मुळया फुटतात. पण त्यापासून फुटलेली नवीन वाढ खोडाशीच राहिलेली असते. या पद्धतीत पेराशी मुळया फुटलेले नवीन झाड वेगळे काढून नव्या जागी लावतात. स्ट्रॉबेरीचे धुमारे जमिनीत गाडलेल्या पेल्यात वाढविले आहेत.