Jump to content

धामण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धामण (english:Common rat snake ; शास्त्रीय नाव:Ptyas mucosus) ही भारतात आढळणारी बिनविषारी सापाची जात आहे. उंदीर व तत्सम प्राण्यांचा फडशा पाडणारी धामण ही मानवमित्र आहे परंतु अज्ञानाअभावी अनेकवेळा ती मारली जाते.

धामणीचा आढळ अशियातील बहुतेक देशांमध्ये आहे. भारतात तसेच भारतीय उपखंडात विपुल प्रमाणात आढळते. तिचे मुख्य वसतीस्थान शेती व जंगले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हमखास आढळून येते भर शहरातदेखील बागांमध्ये हीचा वावर दिसून येतो.

वर्णन

[संपादन]

धामीणीला ओळखण्याची सर्वात सोपी खूण म्हणजे तिचे छोटे डोके, मोठे डोळे व जबड्याखालील रेषा. धामण अतिशय लांब असते. सरासरी लांबी ८ ते १० फुट असते व १२ फुटापर्यंत वाढू शकते. धामण ही डोक्यापासून शरीराच्या मध्यापर्यंत जाड होत जाते व शेपटी ही अतिशय टोकदार असते. त्वचा ही हलक्या अथवा गडद हिरव्या, पोपटी, गडद करड्या रंगाची असते. नागांशी रंगात व अंगावरील पट्यांमध्ये तसेच लांबीमध्ये मान उंचावून पहाण्याच्या सवयीमध्ये बरेच नागाशी साधर्म्य असल्याने बहुतेकदा नाग समजून धामीणीला मारले जाते. धामणीचा वेग हे तिचे वैशिष्ट्य आहे. अत्यंत वेगाने हालचाल करून भक्ष्य मिळवण्यात धामण पटाईत आहे.

धामणीचे मुख्य खाद्य उंदीर, घुशी व तत्सम कुरतडणारे प्राणी, एक धामण वर्षाला ६०हून अधिक उंदराचा फडशा पाडते त्यामुळे धामण ही शेतकऱ्याची मित्र आहे. मानवी हस्तक्षेप आणि औद्योगिक प्रदूषणामुळे धामणीला विविध आजार होतात. भारतात अजगर आणि नाग वगळता, धामणीवर सगळ्यात जास्त गोचिडी सापडतात. तसेच अल्बिनो (धवलता) नावाचा जनुकीय आजार ही गुजरात आणि विदर्भातून (अमरावती) नोंदविला गेला आहे. हिंदीत हा साप 'घोडापछाड' किवा 'दरश' नावाने प्रसिद्ध आहे.


चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  • The book of indian Reptiles - Oxford press- BNHS india