धाबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धाबे (अनेकवचन: धाबी) ही दक्षिण आशियातील पारंपरिक घरांमध्ये आढळणारा छतांचा एक प्रकार आहे.

रचना[संपादन]

धाब्याचे छप्पर घालण्याची पद्धत अशी असते : लाकडाचे किंवा बांबूचे कमी व्यासाचे उभे आडवे लांब खांब टाकून त्यावर गवत किंवा नारळाच्या झावळ्या रचतात. त्यावर मातीचे दीड-दोन फूट जाडीचे थर घालतात [१]. मातीचे हे थर चांगले धोपटले गेल्यावर त्यांवर कोळशाच्या खरीचा थर घालतात. ही खर पाणी शोषून घेते[१]. बेताचे पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशांत पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त करण्यास धाब्यांवरील खरीचा थर उपयुक्त ठरतो.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. a b रानडे,फिरोझ. "ब्राह्मण-वाड्यापासून बामन-वाड्यापर्यंत". पद्मगंधा दिवाळी अंक, इ.स. २०१२ (मराठी मजकूर) (पद्मगंधा प्रकाशन, पुणे). pp. ७२. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.