धर्मसिंधु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धर्मसिंधु हा ग्रंथ १७९०-९१ च्या सुमारास काशीनाथशास्त्री उपाध्ये यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे रचला आहे.यांना बाबा पाध्ये या नावानेही ओळखत असत. त्यांनी ‘धर्मसिंधुसार’ किंवा ‘धर्माब्धीसार ‘ नावाचा विस्तृत ग्रंथ लिहिला.त्यालाच ‘धर्मसिंधु’ नावाने ओळखले जाते. धर्मसिंधु हा ग्रंथ हिंदू धर्माची राज्य घटना म्हणून ओळखला जातो.[ व्यक्तिगतमत ]या ग्रंथात धार्मिक निर्णय सप्रमाण दिलेले आहेत.[ संदर्भ हवा ] या ग्रंथात व्यवहारात आवश्यक असलेल्या धर्मशास्त्रविषयाचा विचार त्यांनी निर्णयसिंधु, पुरुषार्थ चिंतामणी, कालमाधव, हेमाद्रि, कालतत्त्वविवेचन, कौस्तुभस्मृत्यर्थसार, वगैरे ग्रंथाचा आधार घेऊन[ संदर्भ हवा ] आणि काही काही ठिकाणी धर्मशास्त्रसंबंधाने काशीनाथ शास्त्री उपाध्याय यांना स्वतःला योग्य वाटणारा निर्णय देऊन उत्तम रीतीने [ व्यक्तिगतमत ]केला आहे. हा निर्णय आजकाल काशीपासून रामेश्वरापर्यंत सर्व विद्वज्जनात संमत झाला आहे. हिंदुच्या धार्मिक आचारांच्या बाबतीत साऱ्या हिंदूस्थानभर हा ग्रंथ प्रमुख्‍ा आधारस्तंभ मानला जातो. [ व्यक्तिगतमत ]न्यायालयातील निर्णयातदेखील याचा उल्लेख करण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ] या ग्रंथाइतका सुबोध व विद्वन्मान्य दुसरा ग्रंथ नाहीच असे म्हटले तरी चालेल.[ व्यक्तिगतमत ]

काशीनाथ शास्त्री उपाध्याय पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. या ग्रंथाच्या रचनेनंतर त्यांनी सन्यांस घेतला.

सदर ग्रंथात व्यवहारातरात उपयोक्त अशा विविध आचार कल्पनांचे विवेचन आहे.[ संदर्भ हवा ] त्यासाठी त्यांनी काही धर्मशास्त्र विषय ग्रंथांचा आधार घेतला आहे तर काही ठिकाणी स्वतःच्या अभ्यासानुसार त्यांनी संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाने कोणकोणते धार्मिक आचार पाळावेत याविषयीचे  मार्गदर्शन उपाध्ये यांनी केले आहे.

हिंदूंचे ऐहिक,धार्मिक  व नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती करावी असा हेतू ठेवून सदर ग्रंथाची रचना केली गेली आहे.[ संदर्भ हवा ]

ज्यावेळी समाजात धार्मिक आचार विषयक संभ्रम निर्माण होतो किंवा अन्य सामाजिक संस्कुतीचे मिश्रण झाल्याने आपण नकी काय करावे असा पेच निर्माण होतो तेंव्हा असे ग्रंथ मार्गदर्शनपर  ठरतात[१].[ व्यक्तिगतमत ]

  1. ^ धर्मसिंधु (उपाध्ये काशीनाथशास्त्री)