द फ्युजिटीव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
द फ्युजिटीव्ह
प्रमुख कलाकार हॅरिसन फोर्ड
टॉमी ली जोन्स
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २००३


द फ्युजिटीव्ह अर्थात फरारी हॅरिसन फोर्डटॉमी ली जोन्सची मुख्य भूमिका असलेला ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट.

कथानक[संपादन]


अत्यवस्थता
खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.


चित्रपटाच्या सुरुवात होते ती शिकागोचा प्रसिद्ध डॉक्टर रिचर्ड किंबल (हॅरिसन फोर्ड) याला अटक होत असते. त्याला त्याच्या पत्नीच्या खून केल्याचा आरोप असतो. त्यानंतर कोर्टातील सुनावणीत रिचर्डने गुन्हा केला आहे हे सिद्ध होते. घटनास्थळीचे सर्व पुरावे रिचर्डनेच खून केला आहे हे सिद्ध करत असतात. तसेच मरण्या अगदी थोड्याचवेळा आगोदर रिचर्डच्या पत्नीने ९११ला फोन केलेला असतो व फोनवर ती 'रिचर्ड नाहि, रिचर्ड नाहि' असे ओरडत असते. खरेतर रिचर्डची खुनीशी झटापट झालेली असते व त्या वेळेस रिचर्डला ती त्याच्याशी नको झटापट करु असे सांगत असते. रिचर्डची खुनीशी झटापट होत असतान त्याचा एक हात कृत्रिम आहे असे लक्षात येते खुनी पळुन जातो व रिचर्ड पत्नीला वाचवायला जातो. तो पूर्ण प्रयत्न करतो पण पत्नीला वाचवू शकत नाहि. त्याच वेळेस पोलीस येतात व रक्तात न्हाहलेला रिचर्डला पोलीस ताब्यात घेतात. सर्व अपील वाया जातात व रिचर्डला जन्मठेपेची शिक्षा होते.

रिचर्डची रवानगी मुख्य तुरुंगात होत असताना, त्याच्या बरोबरचे इतर कैदीपैकी एक जण गोळी घेउन चक्कर आल्याचे नाटक करतो. त्याला काय झाले आहे म्हणून रिचर्डला विचारतात. रिचर्डला लक्षात येते की तो नाटक करत आहे. नाटक करणार्‍च्या तोंडातुन फेस येणे चालु होते. ते पाहून पोलीस सोडवायला येतो. तेवढ्यात पोलिसाच्या हातातील बंदुक घेण्याचा प्रयत्न होतो व झटापट सुरू होते. त्यात ड्रायव्हरला गोळी लागते. पोलीस व एक कैदी मरण पावतो. गाडिचे नियंत्रण सुटते व रस्त्याच्यापासून दुर जाउन पडते. रिचर्ड सावध होतो व लक्षात येते कि गाडी रेल्वेरुळावर येउन पडली आहे व एक रेल्वे सरळ येत असते. जखमी ड्रायव्हरला किल्ली देण्यासाठी सांगतो. तो त्याला किल्ली देतो. दुसरा जखमी साथीदार पळुन जातो. रिचर्ड त्याहि परिस्थितीत जखमी ड्राय्व्हरला गाडिच्या बाहेर पडण्यास मदत करतो व ऍन वेळेस गाडिच्या बाहेर पडतो. रेल्वेच्या धडकेने गाडिचा चक्कचुर होतो. नंतर दुसरा कैदी रिचर्ड पाशी येउन त्याचे पाश सोडवतो व बरोबर येण्याची विनंती करतो. पण रिचर्ड ती टाळतो.

काही वेळाने सर्व पोलिसांचा जमावडा घटना स्थळी येतो. रिचर्ड व अजून एक कैदी फरारी आहेत असे लक्षात येते. पोलिसांचा म्होरक्या अंत्यत चाणाक्ष अधिकारी सॅम्युएल गेरार्ड ( टॉमी ली जोन्स) लगेचच ताडतो कि या भागात कैद्याना पायी पळण्याशिवाय पर्याय नाहि व जखमी अवस्थेत तो काही मैलाचा आतच असेल असा अंदाज लावतो व सर्वत्र शोधाचे आदेश देतो. रिचर्ड इकडे एका जवळच्या गावातील हॉस्पीटल मध्ये पोहोचतो व लपुन स्वता:वर शुष्रुशा करून घेतो व दाढी काढून तेथील एका पेशंटचात नाष्टा करून बाहेर पडतो. हॉस्पीटल मध्ये रिचर्डचे वर्णन आलेले असते. बाहेर पडताना पोलीस त्यालाच रिचर्डचे वर्णन विचारून त्याला पाहिले आहे का विचारतो पण दाढी काढल्याने ओळखू येत नाहि.

हॉस्पीटल मधून बाहेर पडताना एकगे पोलीस रिचर्डला ओळखतो, पण तो पर्यंत रिचर्ड हॉस्पीटलची ॲंब्युलन्स घेउन पळून जातो. ही खबर गेरार्डला मिळते व रिचर्डच्या मागे पोलिसांचा ससेमिरा चालु होतो. पोलीस रिचर्डला एक बोगद्यामध्ये गाठतात. पण पोलिसांच्या हाती न लागता बोगद्यातील सांडपाण्याच्या कालव्यातुन निसटतो. गेरार्ड शेवटी रिचर्डला शोधुन काढतो व पोलिसांन शरण येण्याची विनंती करतो परंतु रिचर्ड त्याऍवजी कालव्याच्या शेवटी असलेल्या धबधब्या मध्ये उडी टाकतो. सर्वांच्या मते रिचर्डचे अश्या प्रकारे उडी मारल्या नंतर त्याचे जगणे अशक्य आहे परंतु रिचर्ड वाचतो व कसाबसा शिकागोला परत पोहोचतो. गेरार्ड देखील रिचर्डचा मृतदेह न मिळाल्याने मोहिम तात्पुरती स्थगित करतो.

शिकागो मध्ये पोहोचल्या वर रिचर्डची स्वता:ची खुनी कोण अशी मोहिम चालु होते. त्याच्या मित्रांना पैशाची मदत मागतो परंतु मिळणे अवघड असते. फोन टॅप झाल्यामुळे रिचर्ड जिवंत आहे असे पोलिसांना कळते व कुठे आहे त्याचा माग काढणे चालु होते. कृत्रिम अवयव संस्थेमध्ये रिचर्ड खोटे ओळख पत्र बनवुन प्रवेश मिळवतो व कंप्युटर वरून त्याला आठवते त्याप्रमाणे खुनीशी झटापट होताना कृत्रिम अवयव कोणता आहे व तो शहरामध्ये कोणाकोणाला आहे याची माहिती मिळते

भारतीय आवृती[संपादन]

हिंदी व तेलुगु मध्ये या चित्रपटाची नक्कल करण्याचा प्रयत्न क्रिमिनल या चित्रपटात झाला. या मध्ये डॉक्टरची भूमिका नागार्जुन याने केली होती.