द डिपार्टेड (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द डिपार्टेड
220 px
निर्मिती वर्ष २००६
भाषा इंग्लिश
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
प्रमुख कलाकार लिओनार्दो दि काप्रिओअत्यवस्थता
खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

द डिपार्टेड हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ऑस्कर पुरस्कारविजेता चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका लिओनार्दो द कॅप्रियोची असून बॉस्टन शहरातील पोलिस व गुन्हेगारी जगतातील संघर्षावर आधारित आहे. यात गुन्हेगारी जगतातील डॉन कोस्टेलोचा साथीदार पोलिस सेवेत रुजू होतो व स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटमध्ये वरच्या हुद्यावर काम करत असतो व कोस्टेलोसाठी हेरगिरी करत असतो. त्याचप्रमाणे पोलिसांनीही आपला खबऱ्या कोस्टेलोच्या गटात सोडलेला असतो. पोलिस व कोस्टेलो दोघांनाही कळते की आपापल्या गटात कोणीतरी खबऱ्या आहे व दोन्ही गटात या दोघांवरतीच खबऱ्या हुडकून काढण्याची जबाबदारी असते. त्या ओघाने खरी जबाबदारी असते की आपल्या समोरच्या गटात खरा खबऱ्या कोण आहे.

हा चित्रपट अत्यंत उत्कंठावर्धक असून एकूण ४ ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने मिळवले आहेत.