टर्मिनेटर (चित्रपट शृंखला)
science fiction action media franchise | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | media franchise | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | कृत्रिम बुद्धिमत्ता, time travel, AI takeover | ||
मूळ देश | |||
रचनाकार | |||
वापरलेली भाषा | |||
स्थापना |
| ||
| |||
टर्मिनेटर ही तीन हॉलिवूड चित्रपटांची शृंखला आहे. या चित्रपटांतील प्रमुख भूमिका अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी केली आहे. अतिशय गाजलेल्या या चित्रपटांचशंखलेची पटकथा काल्पनिक आहे.जगाचा ताबा घेण्यास मनुष्य व मानवनिर्मित यंत्रे यात भविष्यात महाविनाशक संघर्ष होणार असतो. या युद्धात मानवजातीचे नेतृत्व करणाऱ्या योद्धा (जॉन कॉनॉर)मोठ्या होण्याआगोदर संपवण्याचा डाव यंत्रांकडून आखला जातो. त्यासाठी भविष्यातून या योद्ध्याला संपवण्यासाठी टर्मिनेटर पृथ्वीवर पाठवला जातो. परंतु दरवेळेस या योद्ध्याचे रक्षण करणाराही एक संरक्षक पृथ्वीवर पाठवला जातो. या भविष्यकालीन योद्धयाला एक जण मारणार तर एक वाचवणार असतो. व या दोघांमध्ये होणारा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. पहिल्या भागात जॉन कॉनॉरच्या आईला जॉनच्या जन्मा आगोदर लक्ष्य केले जाते. या भागात अरनॉल्ड श्वार्जनेगर खलनायकाच्या भूमिकेत असतो. दुसऱ्या भागात जॉन लहान असताना त्याच्यावर हल्ला होतो. यावेळेस अरनॉल्ड रक्षकाच्या भूमिकेत दाखवला आहे. तिसऱ्या भागात जॉन मोठ्या झाल्यावर त्याला पुन्हा टर्मिनेटर पासून वाचवण्याचे काम अरनॉल्डकडून होते.
ही चित्रपट शृंखला अरनॉल्ड श्वार्जनेगर साठी मैलाचा दगड ठरली. या चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तसेच ऍकशन चित्रपटांना या चित्रपटाने ग्राफिक्सच्या रूपाने नवीन पायंडा घालून दिला. चित्रपटाचे भाग
- भाग पहिला- द टर्मिनेटर
- भाग दुसरा - टर्मिनेटर २-द जजमेंट डे
- भाग तिसरा - टर्मिनेटर ३ - द राईज ऑफ मशीन्स
- भाग चौथा - टर्मिनेटर ४ - द साल्व्हेशन