टर्मिनेटर २-द जजमेंट डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
टर्मिनेटर २ - द जजमेंट डे
House of John Connor (Terminator 2).jpg
जॉन कॉनरचे घर
दिग्दर्शन जेम्स कॅमेरून
निर्मिती जेम्स कॅमेरून
कथा जेम्स कॅमेरून
विलियम विशर
प्रमुख कलाकार आर्नोल्ड श्वार्झनेगर
लिंडा हॅमिल्टन
एडवर्ड फर्लांग
रॉबर्ट पॅट्रिक
संगीत ब्रॅड फिडेल
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
भाषा इंग्रजी
प्रदर्शित ३ जुलै १९९१
अवधी १३७ मिनीटेटर्मिनेटर २-द जजमेंट डे हा टर्मिनेटर चित्रपट शृंखलेतील दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट नुसतेच टर्मिनेटर २ किंवा टी२ असे ओळखले जातो. हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला. जेम्स कॅमेरून दिग्दर्शीत या चित्रपटातील प्रमुख भूमिका आर्नोल्ड श्वार्झनेगर ,लिंडा हॅमिल्टन, एडवर्ड फर्लांग व रॉबर्ट पॅट्रिक यांनी केली आहे. सॅराह कॉनर व तिचा दहा वर्षाचा मुलगा जॉन कॉनर व टर्मिनेटर हे तिघे मिळून मशीन जगताने पाठवलेला पाऱ्याचा यंत्रमानवाशी सामना करतात जेणेकरून पृथ्वीवर मानवाच्या चुकिने होणारा महाविनाश टाळला जाईल.अशी चित्रपटाची केंद्रीय कल्पना आहे. हा चित्रपट ऍक्शन चित्रपटातील सर्वात गाजलेल्या चित्रपटात गणला जातो. तसेच टर्मिनेटर चित्रपट शृंखलेतील सर्वात गाजलेला चित्रपट आहे. हा चित्रपट मुख्यत्वे या चित्रपटात केलेल्या ग्राफिक्सच्या वापरावर प्रसिद्ध झाला व तसेच नंतरच्या सायन्स फिक्शन चित्रपटांवर या चित्रपटाचा मोठा प्रभाव आहे.[१]. या चित्रपटात प्रथमच मानवाच्या नैसर्गिक हालचाली कंप्युटर ग्राफिक्सच्या सहाय्याने बनवल्या व वितळणाऱ्या पाऱ्याचा यंत्रमानव दाखवण्यात यश मिळवले.[२]. या चित्रपटाने मेक अप, ध्वनीमुद्रण, व विज्युअल इफेक्टस साठी ऑस्कर पुरस्कार मिळवले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "50 Most Influential Visual Effects Film of All Time [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2007-07-15 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "Visual and Special Effects Film Milestones". 2007-07-15 रोजी पाहिले.