दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे
Appearance
(द.पां. खांबेटे या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे | |
---|---|
जन्म |
५ जुलै, इ.स. १९१२ महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
६ ऑगस्ट, इ.स. १९८३ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे (५ जुलै, इ.स. १९१२ - ६ ऑगस्ट, इ.स. १९८३:मुंबई) हे मराठी लेखक होते.
युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परामानसशास्त्र,अध्यात्म, भविष्य असे विविध लेखनप्रकार हाताळणारे लेखक म्हणून परिचित आहेत. विनोदी साहित्य लेखनातही त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांसाठी २० वर्षांहून अधिक काळ दरमहा लेखन केले. त्यांनी सोमाजी गोमाजी कापसे, भाऊ हर्णेकर, रमाकांत वालावलकर, अवधूत आंजर्लेकर, मुमुक्षू, ज्ञानभिक्षू अशा वेगवेगळ्या टोपणनावांनी लेखन केले.
साहित्य
[संपादन]- आटप,अरे आटप लवकर (रहस्यकथा)
- माझं नाव रमाकांत वालावलकर (विज्ञानकथा)
- दहा निळे पुरुष (विज्ञान काल्पनिका)
- चंद्रावरच खून (गूढकथा)
- न्यूनगंड (मानसशास्त्र)
मासिकांसाठी लेखन
[संपादन]- लोकमान्य (मासिक)
- हंस (मासिक)
- मोहिनी (मासिक)
- नवल (मासिक)
निधन
[संपादन]६ ऑगस्ट १९८३ रोजी दादर येथील विजयनगरमधील त्यांच्या घरी हृदयविकाराने निधन झाले.
बाह्य दुवे
[संपादन]- द. पां. खांबेटे अष्टपैलू प्रतिभेचा साहित्यव्रती, लेखिका अरुणा अंतरकर, लोकसत्ता, दि ०८.०७.२०१२[मृत दुवा]
- तृप्तीने काठोकाठ भरलेलं जीवन[permanent dead link]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |