दोडका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दोडके या पानावरून पुनर्निर्देशित)


दोडक्याचे वनस्पतिशास्त्रीय चित्र

दोडका, अर्थात शिराळे, (लेखनभेद, अन्य नावे: दोडके, शिरांचा दोडका, शिराळे, कोशातकी; शास्त्रीय नाव: Luffa acutangula, लुफ्फा अक्यूटॅंगुला ; इंग्लिश: Ridged luffa, रिज लुफ्फा ;) हा दक्षिण आशियापासून आग्नेय आशियापूर्व आशियापर्यंत आढळणारा एक वेल आहे. याला दंडगोलाकार, शिरा किंवा कंगोरे असलेल्या सालीची फळे येतात. याची कोवळी फळे भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो, तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पॉंज म्हणून वापरली जातात. दोडक्यांचा वापर आयुर्वेदात, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे.

कडू दोडकी[संपादन]

याचा एक प्रकार कडू दोडकी ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत