Jump to content

देवयानी फरांदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देवयानी सुहास फरांदे या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रा. देवयानी फरांदे M.Sc., Ph.D

आमदार

कार्यकाळ
२०१९ – २०२४

शिक्षण एम.एस्सी.(मायक्रो बायोलॉजी), (पुणे विद्यापीठ), पी.एच.डी (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ)

सौ.देवयानी सुहास फरांदे या विधानसभेत नाशिक (मध्य) मतदारसंघातून सदस्य असून विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा.नारायण सदाशिव फरांदे यांच्या स्नुषा आहेत.

राजकीय कारकीर्द

[संपादन]
  • गेल्या ३० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या
  • महाविद्यालयीन जीवनात जनरल सेक्रेटरी म्हणून काम सांभाळले.
  • सन १९९७ ते सन २०१४ या कालावधीत ३ वेळा नाशिक महानगरपालिका नगरसेवक म्हणून उल्लेखनीय काम
  • सन २००९ ते सन २०१२ या कालावधीत नाशिक महानगरपालिका उपमहापौर म्हणून भरीव कामगिरी
  • सन २००४ ते २०१३ या कालावधीत महिला मोर्चा प्रदेश चिटणीसपद भूषविले.
  • अभ्यासू व परखड नेतृत्व गुणांमुळे विधानसभेत पक्ष-प्रतोदपदी निवड.
  • महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या इतर मागासवर्गीय समिती व उपविधान समिती सदस्या.
  • सन २०१५ च्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनातील सभाध्यक्ष तालिकेवर नियुक्ती.
  • सन २०१९ मध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघतून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड.
  • लोकप्रिय व अभ्यासू आमदार म्हणून ख्याती.

उल्लेखनीय कामे

[संपादन]
  • नाशिक औद्योगिक क्षेत्र विकासासाठी उद्योजकांना सवलतीत वीज पुरवठा मिळण्यासाठी विधानभवनात आवाज उठविला.
  • आ. देवयानी फरांदे यांनी धान्य वितरणाचा 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून दिला. त्याची दखल तत्कालीन अन्न व नागरी पुरवठामंत्री मा. गिरीश बापट यांनी घेत यंत्रणेतील दोष दूर करत धान्य पुरवठा सुरळीत केला.

सामाजिक योगदान

[संपादन]
  • वुमन्स फोरम आणि दुर्ग विकास महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्नशील

पुरस्कार

[संपादन]
  • नाशिक सिटीझन फोरमतर्फे आदर्श नगरसेविका पुरस्काराने सन्मानित
  • महात्मा फुले समाज विकास संस्था, नाशिक यांच्यावतीने दिव्य ज्योती पुरस्काराने सन्मानित