देवनवरी
Appearance
देवनवरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक गाव आहे.[१]. हे स्थान तेथील नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडासाठी ओळखले जाते. या कुंडातील पाण्याला सतत उकळ्या फुटत असतात. स्थानिक निरीक्षणानुसार, या परिसरात टाळ्या वाजवल्यास पाण्याचे उकळणे आणि त्यातील बुडबुडे वाढतात.
हे गाव गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वसलेले असून येथील लोकसंख्या प्रामुख्याने शेती आणि वनोपजावर आधारित आहे.[२]. येथील गरम पाण्याचे स्त्रोत भूगर्भीय हालचालींचे संकेत देतात, ज्यामुळे हे स्थळ पर्यटन आणि भौगोलिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.
मराठी नाट्यसृष्टीत प्रेमानंद गज्वी देवनवरी या नावाचे एक नाटक देखील आहे."नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याबरोबर संवाद लाइव". मराठीसृष्टी. १५ मे २०२६ रोजी पाहिले..
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "देवनवरी". मराठी विकिपीडिया. १५ मे २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Demography". District Gadchiroli, Government of Maharashtra. १५ मे २०२६ रोजी पाहिले.