चारुशीला साबळे
Appearance
| चारुशीला साबळे वाच्छानी | |
|---|---|
| जन्म | चारुशीला साबळे |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| भाषा | मराठी |
| वडील | शाहीर साबळे |
| आई | भानुमती बनसोडे |
| पती | अजित वाच्छानी |
| अपत्ये | त्रिशाला वाच्छानी, योहाना वाच्छानी |
चारुशीला साबळे ह्या एक मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. शाहीर साबळे आणि भानुमती बनसोडे या जोडप्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. देवदत्त साबळे, वसुंधरा आणि यशोधरा ही त्यांची भावंडे असून संपूर्ण साबळे कुटुंब हे लोककलेला वाहिलेलं आहे.[१]
हिंदी चित्रपट अभिनेते अजित वाच्छानी सोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना त्रिशाला आणि योहाना अशा दोन मुली झाल्या. त्रिशाला हवाई सुंदरी असून योहाना ह्या एक अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द सांभाळत आहेत.[२]
इ.स. १९८७ मधील गंमत जंमत या मराठी चित्रपटातील त्यांची अशोक सराफ सोबतची जोडी आणि किशोर कुमार व अनुराधा पौडवाल यांनी यांनी गायलेले गाणे 'अश्विनी ये ना' ये त्यांना चांगलीच ओळख देऊन गेले.[३][४]
- प्रियतमा (२०१४) - परश्याची आई
- मी सिंधुताई सपकाळ (२०१०) - सिंधूची आई
- गाव तसं चांगलं (२००८) - रुक्मिणी शाहजी पवार
- लपुन छपून (२००६)
- भस्म (१९९४) परे
- माहेरची साडी (१९९१) - लक्ष्मीची शेजारीण
- तुझी माझी जमली जोडी (१९९०) - मेरी
- अंजाने रिश्ते (१९८९) - इंदू मोहन
- कयामत से कयामत तक (१९८८) - पार्वती
- गंमत जम्मत (१९८७) - अश्विनी पी. वडके
- ये कहाणी नइ(१९८४)
- लक्ष्मीची पाऊले (१९८२)
संदर्भ
[संपादन]- ↑ "साबळे शाहीर". 2021-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "trivia" (इंग्लिश भाषेत). ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "Exclusive! Sachin Pilgoankar shares a personal anecdote about Kishore Kumar's first Marathi song 'Ashwini Ye Na'" (इंग्लिश भाषेत). ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "'अश्विनी ये ना...' गाण्याची पुन्हा एकदा धूम". ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "Charusheela Sabale" (इंग्लिश भाषेत). ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील चारुशीला साबळे चे पान (इंग्लिश मजकूर)