दी रवीझ हॉटेल, कोल्लम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दी रवीझ हे पंचतारांकित हॉटेल भारत देशाचे केरळ राज्यातील कोल्लम शहरातील थेवल्ली येथे अष्टमुदी तलावाचे काठावर आहे. हे दी रवीझ अष्टमुदी हॉटेल म्हणून ही ओळखले जाते.[१] या हॉटेलची मालकी रवीझ हॉटेल्स अँड रेसोर्ट्स कंपनीची आहे. इग्ने पॅन्डल या कोल्लम स्थित वास्तु विशारदाणे याचा आराखडा बनविलेला आहे. या हॉटेल मध्ये 90 खोल्या, 9 सूट, झोपडी, खाजगी पोहण्याच्या तलवासह उध्यान घरे, आयुर्वेदिक स्पा आणि 4 रेस्टोरंट आहेत.बॉलीवूड स्टार शाहरुख खान आणि मल्ल्याळी नट मोहन लाल यांनी या हॉटेलचे दी.19 ऑगस्ट 2011 रोजी उद्घाटन केले होते.[२]

हॉटेल[संपादन]

रविझ हॉटेल म्हणजे फावल्या वेळातील आनंद लुटण्याच्ये आणि व्यवसाय केंद्र म्हणूनच प्रशिद्द आहे. हे शोधण्यास अतिशय सोपे आहे. कोल्लम मधील थेवल्लीचे माथीलीलया प्रशिद्द पोस्ट ऑफिस पासून जवळ आहे. त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ 70 किमी अंतरावर आहे. कोल्लम रेल्वे स्टेशन 3 किमी अंतरावर आहे. पर्यटकांना आकर्षित करणारी बरीच प्रेक्षणीय स्थळे येथून जवळच आहेत. त्यात सनशेट बोट क्रुज, अमृतपुरी, सस्पेन्शन ब्रिज, आणि वाटर फॉल,तसेच कोल्लम शहरा लगत अलुमकदावू बॅक वॉटर्स, सस्थामकोटा लेक, आणि कोल्लम बीच ही पर्यटकांची आकर्ष स्थळे आहेत.

या हॉटेल मध्ये प्रवेश म्हणजे विविधा कलागुणांचा खजिना, ऐतिहाशिक आणि आधुनिक वेगवेगळे वस्तूकला,आराखडे यांचे नमुने, आकर्षित करतात. या हॉटेल ने अस्थमुदी तलावाच्या बॅक वाटरचे बाजूवर खास अथीतींच्यासाठी जॉगिंग पार्क बनविलेला आहे. येथे अथीती बोटिंगची मजा घेऊ शकतात तशेच केरळ हाऊस बोटमध्ये निवास करू शकतात. खरोखर हा एक स्वप्नवत अनुभव मिळतो. आरामदायक निवासाच्या सुविधेव्यतिरिक्त या हॉटेल मध्ये लग्न समारंभासाठी, लग्न स्वागत समारंभासाठी, खाजगी समारंभासाठी सुविधा देते.[३]

आहार आणि पेय[संपादन]

रविझच्या नदीचे बाजूचे मल्टि उपाहारगृहात भारतीय, चायनीज, आणि इतर खंडातील सर्व प्रकारचे अन्न मिळते.[४] रविझच्या पेरगोला उप आहार ग्रहात इटालियन,चायनीज आणि त्याचबरीबर इटालियन पद्दतीने खास बनविलेले ताजे ताजे सी फूड मिळते. रविझच्या रानथल उपहार ग्रहात चविष्ट असे तोंडाला पाणी सुटणारे चायनीज,भारतीय उपखंडातील आहार मिळतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्टचा उद्घाटन झाला".
  2. ^ "द रविज - पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्टचा उद्घाटन शाहरुख खान च्या हस्ते झाला".
  3. ^ "द रविज रिज़ॉर्ट, सर्वोत्तम सुविधा बद्दल".
  4. ^ "लेकसाइड उपाहारगृह, द रविज कोल्लम ची समीक्षा".