दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस हा मार्क रॉब्सन यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९५८ मध्ये प्रदर्शित झालेला एक इंग्रजी चित्रपट आहे. इन्ग्रिड बर्गमन आणि कर्ट जर्गन्स हे या चित्रपटातील मुख्य कलाकार होते. ह्या चित्रपटात इन्ग्रिडने चीनमध्ये स्थायिक होण्याची आकांक्षा बाळगणार्‍या ग्लॅडिस ऐलवर्ड नावाच्या इंग्लिश महिलेची भूमिका केली आहे. धर्मप्रचारक म्हणून तिथे जाण्याची संधी हुकल्यानंतर कष्टाने पैसा जमा करून अखेर ती चीनमध्ये दाखल होते आणि एक खानावळ तिथे चालविते. [१]

इन्ग्रिड बर्गमनच्या या चित्रपटातील भूमिकेचे, विशेषतः तिच्या मुद्रा-अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले आहे. [२]

संदर्भ[संपादन]