दिव्याचा सापळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिव्याचा सापळा यास "प्रकाश सापळा" असेही म्हणतात.यात बहुतेक पिकांवर आक्रमण करणाऱ्या किडींना नियंत्रणात आणता येते.तुडतुडे,बोंड अळीचे पतंग किंवा कोणत्याही प्रकारचे पतंग हे प्रकाशाकडे आकृष्ट होतात. या तंत्राचा वापर करून हा सापळा बनविण्यात आला आहे.

वर्णन[संपादन]

हा अतिशय सोपा प्रकार आहे. शेताच्या साधारणतः मध्य भागात,पररट भांडेघमेले यात केरोसिनयुक्त पाणी ठेवल्या जाते.यावर मधोमध गॅसबत्ती किंवा दिवा ठेवल्या जातो.या दिव्याकडे आकर्षित होऊन किडे/पतंग त्या भांड्यात पडतात व मरतात. याद्वारे आपोआप किडींचे नियंत्रण होते.हा दिवा सहसा बांबूच्या तिकाटण्यावर टांगून त्याखाली भांडे ठेवतात. याची उंची, पिकांच्या उंचीस अनुरूप अशी, अनुभवाने व निरिक्षणाने ठरवावी लागते.

सापळा लावण्याची वेळ[संपादन]

हा सापळा सुर्यास्तानंतर साधारणतः मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवावा.

बाह्यदुवे[संपादन]