दिनकर कामण्णा
Appearance
दिनकर कामण्णा तथा दिनकर ढेरे हे १९४० च्या सुमारास लोकप्रिय असलेले विनोदी नाट्य कलावंत होते. गडकऱ्यांच्या भावबंधन नाटकातल्या कामणाा नावाच्या कानडी वैद्याची भूमिका ते करत; यावरूनच त्यांना दिनकर कामण्णा हे टोपणनाव मिळाले. ढेरे यांना विनोदी अभिनयाचा मानदंड समजले जाते. ते विनोदाला विदूषकी थाट न आणता वाक्याच्या अचूक फेकीबरोबर विनोद साध्य करीत.
सुरुवातीला किर्लोस्कर नाटक कंपनी, मग नाट्यविनोद कंपनी, त्यानंतर दीनानाथ मंगेशकरांची बलवंत नाटक कंपनी, हिराबाई बडोदेकरांची नाट्यसंस्था आणि शेवटी लोंढ्यांची राजाराम संगीत नाटक मंडळी, इ. नामवंत नाट्यसंस्थांमथून ढेरे यांनी कामे केली.
ढेरे हे नाटकांत गात असत. याविषयी माहिती अधिक प्रचलित नाही. ते कटाव, फटके असले प्रकार गायचे.
नाटकांतील भूमिका
[संपादन]- उत्तर : तात्यासाहेब केळकर यांचे वीर विडंबन
- कामण्णा : राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला
- जिवाजीपंत कलमदाने : राम गणेश गडकरी यांचे राजसंन्यास
- रमण : मामा वरेरकर यांचे कुंजविहारी
- राणोजीराव : चौदावे रत्न (अर्थात त्राटिका, लेखक - वा.बा. केळकर)
- लक्ष्मण : रामराज्यवियोग (नाटकाचे मूळ लेखक - अण्णासाहेब किर्लोस्कर. हे अपुरे नाटक बलवंत कंपनीने दुसऱ्या लेखकाकडून पूर्ण करवून घेतले आणि सन १९२३ साली बेळगावात रंगभूमीवर आणले.)
- विद्याधर : वासुदेवशास्त्री खरेलिखित संगीत उग्रमंगल
गुजराती नाटके
[संपादन]- हिंदप्रताप थिएट्रिकल्सचे 'खूश अंजाम . या नाटकाची जाहिरात मराठी रंगभूमीना मशहूर कलाकार काॅमेडियन मास्टर कामण्णा एटले मास्टर दिनकर ढेरे प्रथमत: गुजराती नाटकमां अशी केली जाई. ही भूमिका खूप गाजली. नाटकातील कान्हा मुखसेना बोलो या गीताच्या चालीवरच्या त्याने गायलेल्या विनोदी नाट्यगीताने गुजराती प्रेक्षकांना रंगभूमीवरील शास्त्रीय संगीताची झलक दिली.
चित्रपट
[संपादन]- छत्रपती सिनेटोनचे 'स्वराज्य सीमेवर' (अभिनय आणि एका गाण्याचे संगीत दिग्दर्शन, बाकीच्या गाण्यांचे दादा चांदेकर) : या नाटकासाठी एका करुण प्रसंगी गावयाच्या गीताची चाल त्यांनी पैज लावून दिली होती. [ संदर्भ हवा ] मूळ दादा चांदेकर ही एक चाल लावीत होते. त्यांच्याकडून ढेरे यांनी १०० रुपयांची पैज जिंकली.
- भालजी पेंढारकरांचा 'सूनबाई'