Jump to content

दालन:मंदिर/निवडक मंदिरे/6

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बृहदेश्वर मंदिर तामिळनाडूतील तंजावर येथे चोल घराण्यातील राज राज यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर आकाराने प्रचंड स्वरूपाचे आहे आहे. या मंदिराचे गर्भगृह तीस चौरस मीटर असून त्याची उंची 60 मीटर आहे. भारतातील सर्वात उंच शिखर असलेले हे अद्वितीय असे मंदिर आहे. गर्भग्रह,अंतराळ, मंडप,मुख्य मंडप आणि नंदीमंडप अशी या मंदिराची रचना आहे. गाभार्‍याच्या भोवती प्रदक्षिणामार्ग आहे. गाभार्‍याच्या भिंतीवर चोल काळामध्ये शिवपुराणातील चित्रे रंगवलेली आहेत बृहदेश्वर मंदिराचा परिसर आयताकार आणि विस्तृत आहे. भोवती भिंत व ओवर्‍या आहेत. तीन बाजूने प्रवेश द्वार आहेत.पूर्वेकडे द्राविड पद्धतीचे गोपूर आहे.