दालन:तत्त्वज्ञान/मुख्यलेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तत्त्वज्ञान म्हणजे वास्तव, अस्तित्व, ज्ञान, मूल्ये, तर्क, मन आणि भाषा अशा बाबींशी संबंधित सामान्य व मूलभूत समस्यांचा अभ्यास होय. ह्या समस्यांचा विचार करणाऱ्या इतर मार्गांपासून चिकित्सकतेमुळे व तर्काधिष्ठित युक्तिवादामुळे तत्त्वज्ञान वेगळे ठरते. तत्त्व आणि ज्ञान या दोन शब्दांचा मिळून तत्त्वज्ञान हा एक शब्द तयार होतो. 'तत्त्व' म्हणजे काय? या तात्त्विक प्रश्नाचे स्वरूप या शाखेमध्ये मांडले जाते. पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली.

मुख्य पान: तत्त्वज्ञान