Jump to content

आनंदराव नेवाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दामोदरराव नेवाळकर या पानावरून पुनर्निर्देशित)


झांशी‌ संस्थान महाराजाधिराज श्रीमंत महाराज गंगाधरराव नेवाळकर आणि महाराणी लक्ष्मीबाईसाहेब नेवाळकर यांचे हे दत्तकपुत्र होते.

  • जन्म : १५ नोव्हेंबर १८४९
  • मुळ नाव‌ : आनंदराव नेवाळकर
  • जनक : वासुदेवराव नेवाळकर (पारोळा, जळगाव)
  • दत्तक : राजा गंगाधरराव,‌ राणी लक्ष्मीबाई
  • पुत्र : लक्ष्मणराव झांशीवाले
  • मृत्यू : २८ मे १९०६ इंदूर

दामोदरराव गंगाधरराव नेवाळकर

[संपादन]

श्रीमंत युवराज दामोदरराव गंगाधरराव नेवाळकर

  • जन्म : १५ नोव्हेंबर १८४९ पारोळा जळगाव
  • मुळ नाव : आनंदराव नेवाळकर
  • जहागिरदार : पारोळा जळगाव
  • संस्थान‌ : झांशी,‌ बुंदेलखंड
  • जनक : वासुदेवराव नेवाळकर
  • दत्तक : राजा गंगाधरराव,‌ राणी लक्ष्मीबाई
  • पुत्र : लक्ष्मणराव झांसीवाले
  • मृत्यू : २८ मे १९०६ इंदूर

नेवाळकर कुळ व‌ जहागीर

[संपादन]

झाशी हे उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडाचे मराठा शासित राज्य. पेशव्यांची ही जाहगीर होती. महाराजा छत्रसाल ह्यांनी बुंदेलखंडचा तिसरा हिस्सा थोरल्या बाजीरावांस दिला त्या हिस्स्यात झाशी हे राज्य होते. पुढे पेशव्यांनी नेवाळकर परीवाराला सुभेदारी म्हणून हे राज्य दिले.याणि कोकणवासी नेवाळकर बुंदेलखंडी झाशीचे सुबेदार झाले.

नेवाळकर हे मुळात: कोकणातले. रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट हे नेवाळकरांचे मुळ गाव. आज ही नेवाळकर कुटुंब येथे वास्तव्यास आहे. पुढे इंग्राजांच्या संधी पत्रात स्वाक्षरी करून झाशीचे वंशपरंपरागत राजे ही पदवी मिळवली. आणि रामचंद्रराव नेवाळकर ह्या कुटुंबाचे पहिले राजे म्हणून झाशीच्या सिंहसनावर बसले.

नेवाळकर वंशाचे मुळ पुरूष हरी रघुनाथराव नेवाळकर होते. त्यांचे दोन पुत्र होते. एक दामोदर पंत आणि दुसरा खंडेराव. दामोदर पंतचा वंश हाच मुळ झाशीचा राजघराणे म्हणून प्रसिद्ध आहे. तर खंडेराव यांचा वंश महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पारोळा या गावी राहत असे. पारोळा ही पेशव्यांकडून मिळालेली जाहगीर.

जन्म

[संपादन]

पारोळा नेवाळकर कुटुंबातील वासुदेवराव नेवाळकर यांच्या घरी १५ नोव्हेंबर सन् १८४९ रोजी आनंदराव नेवाळकर नावाच्या ह्या गोंडस व गोजिरवाणी मुलाचा जन्म झाला. वासुदेवराव नेवाळकर हे महाराज गंगाधरराव यांचे चुलत भाऊ. ते पारोळा येथे राहत होते.

वासुदेवराव आपल्या परिवारासह दररवर्षी झाशीच्या विजयादशमी उत्सवात सहभागी होत. ते पारोळा येथून झाशीला येत. महाराज गंगाधरराव आपल्या चुलत भावाचे सर्व आदरातिथ्य करीत. ह्या कामात स्वतः महाराणी लक्ष्मीबाई साहेब नियमाने लक्ष देत. १८५३ च्या विजयादशमीला वासुदेवराव आपल्या धर्मपत्नी व आनंदरावासह झाशीला आले. १८५१ साली राणी लक्ष्मीबाईंना दामोदर रावचा पुत्र लाभला. परंतु तो अवघ्या तीनच महिन्यात अल्पायुषी ठरला. पुत्राच्या निधनामुळे राजा राणी खुप दुखावले होते. आणि अश्याच वेळी आनंदरावांना पाहता राणी लक्ष्मीबाईंचे मातृत्व पुन्हा जागे झाले. आपले मातृत्व, प्रेम ते आनंदरावास भरभरून देत. त्या एका क्षणासाठी ही आनंदरावास एकटे सोडीत नसत. अगदी आपला जीव ओवाळून टाकायच्या.

दत्तक विधी‌

[संपादन]

राणी लक्ष्मीबाईंचे मातृत्व आणि झाशीच्या पुढील भविष्यासाठी महाराज गंगाधरराव यांनी वासुदेवराव आणि त्यांच्या धर्मपत्नींशी चर्चा केली. आणि त्यांच्या आनंदरावांस दत्तक घेण्याचे विचार मांडला. वासुदेवराव मनाने अगदी हळवे त्यांनी झाशीच्या भविष्यासाठी आपल्या पुत्राचा त्याग केला. आणि २० नोव्हेंबर १८५३ साली वासुदेवराव पुत्र आनंदराव नेवाळकर हिंदू विधिवत पद्धतीने झाशीच्या राजा राणीचा दत्तक पुत्र झाला. आनंदरावाचे नामकरण करून आपल्या मृत शिशुच्या नावावर दामोदर राव असे ठेवले. संपूर्ण झाशी नगर आनंद उत्सव साजरे करू लागले. युवराज दामोदररावांना झाशीचा वारीस मान्य करावा म्हणून स्वतः महाराज गंगाधररावांनी झाशीचे पॉलिटिकल एजंट मेजर आर.डबल्यू एलिस द्वारा इंग्लंडच्या सरकारांशी पत्र व्यवहार केला. आणि आपली वसीहत तयार केली.

महाराज गंगाधरराव निधन व झांशी खालसा

[संपादन]

दत्तक विधीच्या दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर १८५३ साली श्रीमंत महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आणि १८ वर्षाच्या महाराणी लक्ष्मीबाईंवर वैधव्याचे संकट कोसळले. परंतु न घाबरता न डगमगता ह्या वीर नारी ने झाशी राज्याची सुत्रे आपल्या हातात घेतली. आणि समस्त बुंदेलखंडाचे कर माफ केले. ज्यामुळे इंग्राजांची नाचक्की झाली. ब्रिटिश सरकार ने "doctrine of lapse" ह्या नव्या पोलिसीच्या आधारावर झाशी संस्थान खालसा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा महाराणी लक्ष्मीबाई यांनी वकील जॉन लँगच्या साह्याने ३१ डिसेंबर १८५३ साली लंडनच्या न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु ब्रिटिश सरकारने ती याचिका फेटाळली. आणि १९ फेब्रुवारी १८५४ रोजी लॉर्ड डलहौसीने झाशी संस्थान खालसा करण्याचे फरमान जारी केले. दुसऱ्या दिवशी झाशीचे पॉलिटिकल एजंट मेजर आर.डबल्यू एलिस यांनी तो जाहिरणामा भर दरबारात वाचून दाखवला. आणि राणी लक्ष्मीबाई ह्या क्रोधाने उद्गारल्या... "मी माझी झाशी नाही देणार" परिणामी विरांगानेनी इंग्राजांशी युद्धाचे शंख फुंकले. २१ फेब्रुवारी १८५४ ते २७ फेब्रुवारी १८५४ साथ दिवस इंग्राजांशी झुंज दिली. परंतु इंग्रजांच्या आधुनिक शस्रांसमोर झाशीचा निभाव लागला नाही. आणि ७ मार्च ला ब्रिटिश सरकाराने राणी लक्ष्मीबाईंना झाशी किल्ला सोडून नगरातील राणी महालात जाण्यास सांगितले. तसेच राणीला प्रति महिना ६ हजार पेंशन देऊन व दामोदररावांचे सहा लाख रूपये जप्त केले.१५ मार्च १८५४ साली होळीच्या शुभ मुहूर्तावर राणी लक्ष्मीबाई किल्ला सोडून राणी महालात आल्या. परंतु स्वाभिमानी राणीने इंग्राजांच्या पेंशला ही नकार दिला.

झांशी‌ युद्ध ‌व राजशाही

[संपादन]

वर्ष सरत राहीले. राणी आपल्या आत्मसम्मानासाठी, झाशीसाठी मनात झुरत राहीली. १८५७ चे स्वातंत्र्य वर्ष उजाडले. आणि ४ जून १८५७ ला झाशी येथे क्रांतीकाऱ्यांनी क्रांती घडवली. ह्या युद्धात प्रत्यक्ष रूपी स्वतः राणी नव्हत्या. परंतु ७ जूनला राणीचा किल्ल्यावर कब्जा झाला. आणि १० जूनला राणी सरकार दामोदर रावांच्या नावाने स्वतः झाशी संस्थानच्या राजमाता झाल्या. राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला.

झांशी‌ पत्तन व राणीसाहेब हुतात्मा

[संपादन]

४ एप्रिल १८५८ साली जेव्हा झाशी युद्धा सुरू झाले. तेव्हा आपल्या प्रीय सखी विर्ंगना झलकाराबीच्या साह्याने व शिवछत्रपतींच्या गनिमी काव्याचा वापर करत राणी लक्ष्मीबाई शत्रूची फळी फोडून किल्ल्यावरून निसटून काल्पीला आल्या. आणि क्रमशः कोंच, गुलौली, काल्पी आणि ग्वाल्हेर युद्ध लढल्या. व १७ जून १८५८ ला महाराणी लक्ष्मीबाई हुतात्मा झाल्या.

दामोदररावांचे संघर्ष

[संपादन]

ग्वाल्हेर युद्धात राणीने दामोदररावांची जबाबदारी आपले विश्वासू सेवक रामचंद्र राव देशमुख आणि प्रीय सखी काशीबाई कुनवीन यांस सोपविली. दामोदररावांना राणीच्या पार्थिवावरील सफेद सूतचा निळा चंदेरी साफा, राणीची रत्नजडित तलवार आणि मोतीची कंठीमाळ देण्यात आली. तात्या टोपे, रघुनाथ सिंह, काशीबाई कुनवीन, बांदा नवाब आणि दामोदररावांनी महाराणीला मुखाग्नी दिली. व झाशीची ही पराक्रामी राणी पंचतत्वात विलीन होत कायमस्वरुपी अमर झाली.

रामचंद्र राव आणि काशीबाई कुनवीन ने दोन वर्ष दामोदररावाचा सांभाळ केला. ते दामोदररावाचे संरक्षण करता करता बुंदेलखंडच्या चंदेरी, सागर, ललितपूरच्या जंगलात भटकू लागले. आणि एकदा रामचंद्ररावांचे निधन झाले. मेजर प्लीक द्वारा दामोदर रावांस इंदूरच्या त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.

दामोदर राव के जन्मदाता वासुदेवराव यांच्या मोठ्या चुलत्याचा मुलगा काफीनाथ हरीभाऊ नेवाळकर उर्फ लालाभाऊ हे १८५७-५८ साली झाशीचे तहसीलदार होते. त्यांची पत्नी १८५९ साली झाशी सोडून इंदूरला आली. ह्या नात्याने दामोदरावांच्या काकी लागत. दामोदर राव ह्यांच्याकडेच राहत असे.

५ मे , १८६० साली इंदूरचे रेजिमेंट रिचमंड शेक्सपियर यांनी दामोदररावांची जबाबदारी व देखरेख मुंशी पंडित धर्म नारायण कश्मीरी यांना दिली. दामोदररावास प्रति महिना फक्त १५० रूपये पेंशन सुरू केली. सहा लाख रूपये व ५०० अंगरक्षकांच्या सुरक्षित असणारा हा युवराज आज इंग्रजांच्या मदतीवर जगण्यास मजबूर झाला. दामोदररावांस इंदूरचे शासक होळकरांची ही आर्थिक मदत मिळाली.

काही काळानंतर दामोदररावांचा विवाह वासुदेवराव माटोरकर यांच्या कन्येशी झाला. परंतु १८७२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. से हुआ। १८७२ साली दामोदररावांचा दुसरा विवाह बलवंत राव मोरेश्वर शिरडेर यांच्या कन्येशी झाला. ह्या विवाह सोहळ्यात दामोदररावांची आजी अर्थात राणी लक्ष्मीबाईंची सावत्र आई चिमणाबाई मोरोपंत तांबे उपस्थीत होत्या.

२३ अॉक्टोबर १८७९ रोजी दामोदररावांना एक पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव लक्ष्मणराव ठेवले. दामोदररावांनी झाशी व आपल्या हक्काचे सहा लाख रूपये मिळवण्यासाठी अनेक खटपटी केल्या. परंतु त्यांना काही यश आले नाही. दामोदरराव एक उत्तम चित्रकार होते. त्यांनी आपल्या स्मृतीत असलेल्या आईच्या वर्णाने एक चित्र रेखाटले. हे चित्र राणी लक्ष्मीबाईंचे होते आज हे राणीच्या वंशजांकडे आहे. काही काळानंतर दामोदरराव पुत्र लक्ष्मणराव यांनी आपले आडनाव नेवाळकर काढून झांसीवाले असे ठेवले. आज ही राणीचे वंशज हेच नाव वापरतात.

राजपूत्राचे निधन

[संपादन]

२८ मे १९०६ साली झाशीच्या ह्या युवराज श्रीमंत दामोदरराव गंगाधरराव नेवाळकर यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी इंदूर येथे निधन झाले.