दहिफळ
Appearance
दहिफळ हे महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ८०० ते १००० असून गावातील बहुतेक लोकांचा व्यवसाय शेती आहे. गावाजवळून गिरीजा नदी वाहते. या नदीवर कल्याण-गिरीजा मध्यम प्रकल्प नावाचे धरण आहे. या धरणामुळे आसपासचा परिसर ओलिताखाली आला आहे. या धरणातील पाणी गावाला मिळते.