दर्पण (वृत्तपत्र)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दर्पण (वृत्तपत्र) - (प्रारंभ - ०६ जानेवारी १८३२, अखेर - २६ जानेवारी १८४०) [१]
समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी वार शुक्रवार इ.स. १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात "मराठी पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्याकाळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे.
या वृत्तपत्राने समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रातील मजकूर अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी असे. सुरुवातीला हे पाक्षिक होते. नंतर ते साप्ताहिक झाले.
प्रकाशनाचा उद्देश
[संपादन]भारतीयांना 'देश-काळ-परिस्थिती'चे आणि 'परदेशी राजव्यवहारा'चे ज्ञान मिळवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू करणे मागचा उद्देश स्पष्ट करताना लिहिले होते की लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करत आहोत
१९९७-९८साली मराठीत एकूण १५६१ वृत्तपत्रे असल्याचे वाचण्यात आले आहे. यांत २२५ दैनिके आहेत. [ संदर्भ हवा ]
दर्पण वृत्तपत्राने मराठी वृत्तसृष्टीत नवे पर्व सुरू केले. बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या "दर्पण" मध्ये समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य तत्त्वावर समाजाची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला. जांभेकरांनी या पत्रातून नवीन पर्व निर्माण केले. हे पत्र साडेआठ वर्ष चालले, २६ जानेवारी १८४० रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला. पहिल्या वर्ष अखेरीस ३०० वर्गणीदार होते. [ संदर्भ हवा ]
अधिक माहितीसाठी पाहा
[संपादन]काय झालं ६ जानेवारी १८३२ ला? | पत्रकार दिन विशेष | Incredible मराठी | भाग ९१
संदर्भ
[संपादन]- ↑ "Madhura Welankar - Satam". www.youtube.com. 2026-04-21 रोजी पाहिले.