Jump to content

दगडाबाई शेळके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वतंत्र सैनिक दगडाबाई शेळके यांचे हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील योगदान;

दगडाबाई शेळके यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणूनही ओळखले जाते .1942 मध्ये त्यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामा मध्ये फार मोठे कार्य केलेले दिसून येते . इसवी सन 1938 ते 1948 हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा काळ म्हणून ओळखला जातो . आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भारत स्वतंत्र झाला तेव्हा अनेक संस्थांनी भारतात विलीन व्हायची बाकी होती 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि ही संस्थांनी स्वतंत्र भारतात विलीन झाली .

उरलेली तीन संस्थान म्हणजे हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागड ही संस्थांनी स्वतंत्र भारतात सामील व्हायची बाकी होती . हैद्राबाद संस्थानांमध्ये त्या काळात तेलंगणा सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग होता.

 हैद्राबाद संस्थान ची त्यावेळची लोकसंख्या एक कोटी साठ लाख (1कोटी 60 लाख) इतकी होती .भारताला स्वातंत्र्य मिळाले होते परंतु या तीन  संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते .त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता. आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र व्हायचे होते . मग सुरू झाला आणि  मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम……. 

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मराठवाड्याला हैद्राबादच्या निजामशाही विरोधात दीर्घकाळ लढा द्यावा लागला . त्यात कित्येकांनी बलिदान दिले होते .स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजामांच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली. पण या मुक्ती संग्रामात महिलाचा मौलाचा दगड रचला तो जालन्यातील मर्दानी दगडाबाई शेळके यांनी या संग्रामात चालू असताना निजामांचे जनतेवर अत्याचार चालूच होते .निजामाच्या विरोधात लढा देण्यासाठी या जनतेचे प्रेरणास्त्रोत बनले ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ ,गोविंदभाई श्रॉफ़, दिगंबरराव बिंदू ,रवी नारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे ,भाऊसाहेब वैश्यपायन , देविसिग चव्हाण , बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक ,विजयेंद काबरा यांच्यासारखी खंबीर नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यातल्या लहान थोरापर्यंत पोहोचला .या लढ्याला विशेष योगदान राहिले ते म्हणजे ग्रामीण भागातील स्त्रियांचे आणि त्यात एक म्हणजे दगडाबाई शेळके असं "म्हणतात या लढ्यात दगडाबाईच्या झाशीच्या राणी प्रमाणेच भासायची 'पॅन्ट ' शर्ट घालून आपल्या अपंग मुलांना पाठीला बांधून एका हातात बंदूक दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम धरून सहकारी स्वातंत्र्य सैनिकांना या दगडाबाई रसत पुरवायच्या  . दगडाबाईंनी बंदूक आणि हात गोळे चालविण्याचे प्रशिक्षण घेतले . एकदा निजामाच्या सैनिकांनी त्यांना शस्त्र रंगेहात पकडले होते  . ज्यामुळे त्यांना तुरुंगवास देखील भोगाव लागला  होता . निजामी राजवट संपवायची या ध्यास आणि दगडाबाई शेळके यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात उडी घेतली  .दगडाबाई या मूळच्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर या गावच्या त्यांच्या कामगिरीला समजणे तेव्हा देखील नावेच ठेवली . समाजाने त्यांच्यावर आक्षेप घेतला .त्यांना कुटुंबाच्या तसेच स्वतःच्या नवऱ्याच्या रोशाला समोर जावे लागले होते . दगडाबाईंची माहेरची लढाईला देखील त्या स्वातंत्र्य संग्रामात विशेष स्थान आहे.

दगडाबाईंनी निजामांशी अनेकदा दोन हात केले . त्यांची सर्वात गाजलेली लढाई म्हणजे माहेरची लढाई दगडाबाई यांनी या लढ्यात' टाकळी कोलते' या कॅम्पवर जीवाची परवा न करता निजामांशी लढा दिला होता . तेव्हा त्यांनी एकटीने माहेर असलेल्या कोलते टाकळी शिवारातील रजाकार कॅम्पवर हातबॉम टाकून तेथील कॅम्प उध्वस्त केला होता.

तो इतिहास कधीही विसरणार नाही .