Jump to content

दगडफूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दगडफुल या पानावरून पुनर्निर्देशित)
दगडफूल

दगडफूल (इंग्रजीत lichen) हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. पारंपरिक भारतीय मसाल्याचा तो एक घटक असतो. दगडफुलाचे शास्त्रीय नाव - Parmotrema perlatum आहे. अन्य नावे : शैलेयम् (संस्कृत); कालपासी (तामिळ); दगड़ का फूल (पंजाबी); राठी पूठा (तेलुगू); कल्लू हूवू (कानडी); पत्थर के फूल (हिंदी) आणि बोझवार (उत्तरी भारत). दगडफुलाला एक खमंग मसालेदार वास येतो. ते तेलात परतले की आणखीनच खमंग वास सुटतो.

पाणी, प्रकाश, हवा आणि मूलद्रव्ये या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथेही दगडफुले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी बुरशी वा शैवाल तग धरू शकणार नाही, अशा ठिकाणीही दगडफुले जगतात. या पदार्थाचे काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफुले वापरतात.

कवक आणि शैवाल यांच्या एकत्र येण्यामुळे तयार होणाऱ्या अनेक वनस्पतींपैकी एक वनस्पती. ही सहसा खडकांवर, भिंतींवर किंवा वृक्षांच्या बुंध्यांवर वाढते.

अतिशीत प्रदेशाबरोबरच अतिउष्ण प्रदेशातही दगडफुले आढळतात.