त्रिकोण (ज्योतिषशास्त्र)
Appearance
त्रिकोण तथा ट्रायांग्युलम हा उत्तर खगोलार्धातील एक लहानसा तारकासमूह आहे. हा होरा २ व क्रांती ३०° उत्तरेच्या आसपास आहे. याच्याभोवती ययाती, देवयानी, मीन व मेष हे तारकासमूह येतात. यात सर्व तारे लहान असून पण २–३ प्रतीच्या आल्फा, बीटा व गॅमा या तीन प्रमुख ताऱ्यांची एक काटकोनाकृती यात दिसते. यात युग्मतारेही आहेत. याच्या पश्चिम कडेला एम ३३ ही एक सर्पिल दीर्घिका आहे. पृथ्वीपासून ती ७·२ लक्ष प्रकाशवर्षे दूर असून द्विनेत्री दूरदर्शकामधून दिसू शकते. हा तारकासमूह ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी याम्योत्तर वृत्तावर येतो.