एरोमार
त्रांसपोर्तेस एरोमार, ए.ए. दि सी.व्ही. ही एरोमार नावाने व्यवसाय करणारी मेक्सिकोतील विमानवाहतूक कंपनी आहे. याचा मुख्य तळ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असून मुख्यालय तेथीलच हॅंगर ७मध्ये आहे. [१] ही कंपनी मेक्सिकोमध्ये देशांतर्गत आणि अमेरिकेतील निवडक शहरांदरम्यान विमानसेवा पुरवते.[२]
इतिहास
[संपादन]त्रांसपोर्तेस एरोमारची स्थापना २९ जानेवारी १९८७ रोजी झाली आणि ५ नोव्हेंबर १९८७ रोजी ती कार्यान्वित झाली. त्रांसपोर्तेस एरोमार ग्रुपो एरोमार या खाजगी कंपनीच्या ९९.९९% मालकीची आहे. जुलै २०१० मध्ये या कंपनीत ८६४ कर्मचारी होते. १ एप्रिल २०१० रोजी एरोमारने कॉन्टिनेन्टल एरलाइन्सशी व्यावसायिक करार केला. त्यानंतर एरोमारने दोन बॉम्बार्डिये सीआरजे २०० प्रादेशिक जेट विमाने भाडेतत्त्वावर देण्याचे जाहीर केले.
३० ऑगस्ट २०१० रोजी, एरोमार आणि कॉन्टिनेन्टल एरलाइन्सने आपले फ्रिक्वंट फ्लायर प्रोग्रॅम[मराठी शब्द सुचवा]मध्ये संयोजन जाहीर केले.[३] याव्यतिरिक्त, कॉन्टिनेन्टल आंतरराष्ट्रीय प्रथम आणि बिझनेस क्लास प्रवासी, प्रेसिडेंट क्लबचे सदस्य आणि स्टार अलायन्स गोल्ड गिऱ्हाइकांना मेक्सिको सिटीतील एरोमारच्या सलोन डायमॅंट लाउंजमध्ये प्रवेश करण्यास मुभा दिली.
मायलेजप्लस
[संपादन]एरोमार युनायटेड कॉन्टिनेंटल होल्डिंग्सच्या मालकीची कंपनी नसून तसेच संयुक्त कंपनीचा भाग नसताना किंवा स्टार अलायन्सचा सदस्य नसली तरीही युनायटेड एरलाइन्स मायलेजप्लस कार्यक्रमात भाग घेते.[४]
क्लब
[संपादन]सलोन हिमांटे हे एरोमेरचे खाजगी विमानतळ आहेत.
कोडशेर करार
[संपादन]एरोमारने १ फेब्रुवारी २०११ पासून मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमातनळावर एरोमार आणि कॉन्टिनेन्टल एरलाइन्सच्या सर्व मार्गांवर कोडशेरिंगची लागू केली.[५] एरोमेरने नंतर दुरांगो, मातामोरोस, इहतापा व पिएद्रास नेग्रास यासारख्या अतिरिक्त स्थानिक सेवा सुरू केल्या. त्यावेळी त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय सेवांचे पुनर्मूल्यांकन करण्याची घोषणा केली. एरोमरने पूर्वी ऑस्टिन आणि सॅन ॲंटोनियो, टेक्सास येथे सेवा पुरवली होती. २०१७ च्या सुमारास एरोमार फक्त मॅकॲलन या शहरास आंतरराष्ट्रीय सेवा पुरवते.[६] कॉन्टिनेंटल एरलाइन्सच्या युनायटेड एरलाइन्समध्ये विलीनकरणा बरोबर एरोमारचा करार युनायटेडकडे हस्तांतरित करण्यात आला.
फ्लीट
[संपादन]ऑगस्ट २०१७ मध्ये एरोमारडे खालील विमाने होती:[७]
एयरोमार फ्लीट
प्रकार | एकूण | मागण्या | प्रवासी | नोंदी |
---|---|---|---|---|
एटीआर ४२-३०० | २ | - | ४२ | |
एटीआर ४२-५०० | ८ | - | ४८ | |
एटीआर ४२-६०० | ३ | - | ४८ | |
एटीआर ७२-६०० | ५ | ३ | ६८ | |
एकूण | १८ | ३ |
२०१५ च्या सुरुवातीस, एरोमारने आपली बोम्बार्डिये सीआरजे २०० जेट विमाने विकून टाकली व १५ एएटीआर ४२ टर्बोप्रॉप तसेच दोन नवीन एटीआर ७२-६०० विमाने वापरण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर २०१६ मध्ये, एरोमारने आठ नवीन एटीआर ४२ आणि एटीआर ७२ विमाने विकत घेण्याचे ठरविले आणि आणखी सहा एटीआर ७२ चेऑप्शन[मराठी शब्द सुचवा] घेतले.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ "Aeromar to fly nonstop from McAllen to Mexico City" (PDF). 2011-07-23 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2017-09-18 रोजी पाहिले.
- ^ "Aeromar flight schedule". 2021-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-09-18 रोजी पाहिले.
- ^ "Benefit Partner News: Continental Airlines Strikes Miles Alliance with Mexico's Aeromar".[permanent dead link]
- ^ "United Airlines MileagePlus Aeromar Bonus Miles Campaign September 14 – January 31, 2017".
- ^ "Arrival of Aeromar Flight Marks Return of International Airline Service at TUS". 2020-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-09-18 रोजी पाहिले.
- ^ "Aeromar to fly nonstop from McAllen to Mexico City".
- ^ "Aeromar fleet details".
- ^ "Aeromar signs for 8 firm ATR -600 series aircraft". 2016-11-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-09-18 रोजी पाहिले.