तोर्तिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तोर्तिया (मेक्सिकन स्पॅनिश:Tortilla) ही दक्षिण अमेरिकन बनवली जाणारी चपाती आहे. संपूर्ण अमेरिका खंडात प्रसिद्ध असणारी ही चपाती मका आणि गहू यांच्या पिठापासून आणि मैद्यापासून बनवली जाते. स्पॅनिश लोक दक्षिण अमेरिकेत आल्यावर त्यांनी या मूळ मेक्सिकन चपातीला तोर्तिया असे नाव दिले. (मूलतः स्पॅनिश भाषेत 'तॉर्तिया' या शब्दाचा अर्थ 'आम्‍लेट' असा आहे. मात्र मेक्सिकोतनिकाराग्वात वापरात असलेल्या स्पॅनिश भाषेत हा शब्द या विशिष्ट चपातीस संबोधण्यास वापरला जातो.) दक्षिण अमेरिकेतील वेगवेगळ्या देशांत अशा चपात्या कधी भाजून तर कधी तळून बनवल्या जातात.

या चपातीत सारण भरून तिची गुंडाळी केली असता तिला बारितो, ताको अशा विविध नावांनी ओळखले जाते. अमेरिकेत प्रसिद्ध असणारा बरिटो मात्र मेक्सिकोवासियांचे आवडते अन्न नाही. इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणे अमेरिकन सोपस्कार होऊन हा पदार्थ पक्का अमेरिकन बनला आहे.