Jump to content

तोंडखुरी (पशुरोग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तोंडखुरी हा सहसा पाळीव/दुभत्या जनावरांना होणारा एक पशुरोग आहे.

लक्षणे

[संपादन]

या आजारामध्ये जनावरांना ताप येतो. जनावरांचे शारीरिक तापमान १०२ ते १०४ डि. फे. किंवा यापेक्षा जास्त राहू शकतो. जनावरांच्या तोंडामध्ये हिरड्यांवर, जिभेवर तसेच गालाच्या आतील भागावर पाणी भरल्या सारखे फोड येतात. सोबतच पायांच्या दोन खुरान मधील भागावर फोड येतात व हे फोड लगेचच फुटतात. तेथे भाजल्यासारखे लाल चट्टे तयार होतात. यांची भयंकर आग होत असल्याने जनावरांच्या तोंडातून चिकटसर, तारे सारखी खूप लाड करते आणि जनावर लंगडत चालते. तोंडाची, जिभेची खूप आग होत असल्याने जनावरे खाणे पिणे बंद करते. तोंडातून मचमच असा आवाज येतो. दुधाळ जनावरे दुध एकदम कमी किंवा पूर्णतः बंद करतात. वास्तविक पाहता हा आजार सहा ते सात दिवसांनी आपोआप बरा होतो. परंतु या आजारात ताप खूप येत असल्याने प्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे दुसऱ्या आजाराच्या जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊन दुसरा एखादा आजार जडू शकतो. तसेच खुरातील जखमांवर माशा बसल्यास आळ्या पाडून जखम ची घडल्यास खूर गळून पडू शकते. दुधाळ विदेशी तसेच संकरीत जनावरांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त आढळते. या आजारात मोठ्या प्रमाणात प्राणहानी होत नाही. परंतु या आजारामुळे दुधाळ जनावरांची दूध उत्पादकता जवळपास वीस टक्‍क्‍यांनी कमी होते आणि कष्टकरी जनावरांची काम करण्याची क्षमता ५० टक्क्यांनी कमी होते. लहान वासरे या आजारात मृत्युमुखी पडू शकतात.

हेही बघा

[संपादन]