तैवान सामुद्रधुनी
Jump to navigation
Jump to search
तैवानची सामुद्रधुनी (देवनागरी लेखनभेद: ताइवान सामुद्रधुनी, तायवान सामुद्रधुनी) अथवा फॉर्मोसा सामुद्रधुनी ही चीन व ताइवान या दोन देशांमधील १८० कि.मी. रुंदीची सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी दक्षिण चीन समुद्राचा एक हिस्सा असून तिने दक्षिण चीन समुद्राच्या ईशान्येकडील भाग पूर्व चीन समुद्रास जोडला गेला आहे. या सामुद्रधुनीच्या चिंचोळ्या पट्ट्याची कमीतकमी रुंदी १३१ कि.मी. आहे.