तैग्रिस नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Haifa street, as seen from the medical city hospital across the tigres.jpg
बगदाद शहरातील तैग्रिस नदीचे पात्र
इतर नावे दिज्ला, दिज्ले,
उगम पूर्व तुर्कस्तान
मुख शत्त अल-अरब
पाणलोट क्षेत्रामधील देश तुर्कस्तान, इराक, सीरिया, इराण
लांबी १,९०० किमी (१,२०० मैल)
उपनद्या दियाला, झाब

तैग्रिस सध्याच्या तुर्कस्तान, सीरियाची सीमा आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पूर्वेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.

तैग्रिसची लांबी १,९०० कि.मी. (१,१८० मैल) आहे. हिचा उगम पूर्व तुर्कस्तानमधील टॉरस पर्वतात होतो व साधारण आग्नेयेकडे वहात ही नदी युफ्रेतिस नदीला मिळते.