तृप्ती देसाई
Appearance
(तृप्ती देसाई (निःसंदिग्धीकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)
तृप्ती देसाई | |
---|---|
जन्म |
१२ डिसेंबर, १९८५ तालुका निपाणी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | समाजकारण, राजकारण |
कार्यकाळ | २०१७ पासून राजकारण |
जोडीदार | प्रशांत देसाई |
तृप्ती प्रशांत देसाई (जन्म?- हयात) या भारतीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या असून भूमाता ब्रिगेड नामक (अनरजिस्टर्ड) संघटनेच्या संस्थापक प्रमुख आहेत.
समाजकारण
[संपादन]तृप्ती प्रशांत देसाई इसवी सन २००८ मध्ये एका सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत पुढे आल्या. इसवी सन २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली, इ.स. २०११ मध्ये अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला. इ.स. २०१२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावरून स्थानिक स्वराज्य संस्थेची बालाजी नगर वॉर्डची निवडणूक लढवून पडल्या. इ.स. २०१६ साली शनी शिंगणापूर येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रीयांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले.
पुरस्कार
[संपादन]- सलाम पुणे पुरस्कार, २०१६[१]