तुलसी मुंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुलसी मुंडा (१५ जुलै, इ.स. १९४७ - ) या भारतातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाकरीता काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. मुंडा यांना २००१ साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. लहानपणी मजुरी करावी लागली असली तरी विनोबा भाव्यांशी १९६३ मध्ये झालेल्या एका भेटीनंतर प्रेरित होऊन मुंडा शिकण्या व शिकवण्याकडे वळल्या.