तीवशेमाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तीवशेमाळ हे वाळूटझिरा गावाचा एक छोटासा पाडा आहे ह्या पाड्यावर गावित व थविल परिवार राहतात. ह्या पाडयावर जाण्यासाठी 2017 साल आले तरी साधा मातीचा रस्ता नाही.ही सर्वांत मोठी समस्या आहे. तालुक्याच्या ठीकाणी जावयाचे झाले तर दिड ते दोन कि.मी.चालत जाउन गाडी पकडावी लागते.असे असले तरी हा पाडा सुसक्षित आहे.पाडयावर एकूण 10 ते 12 घरे आहेत. संपूर्ण पाडा हा जंगलाच्या कुशीत वसलेला आहे.जवळूनच तान नदी वाहते.नदीच्या पाण्याचा खळखळाट पावसाळयात व हिवाळ्यात ऐकू येता.तसेच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो.पाडयाच्या दक्षिण दिशेला डोंगर तर उत्तर दिशेला नदी.व नदीच्या पुढे हेदिपाडा हा पाडा आढळून येतो.