तीन विणकरी मुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द थ्री स्पिनर्स
Illustration at page 118 in Grimm's Household Tales (Edwardes, Bell).png
१९१२ चे चित्रण रॉबर्ट ॲनिंग बेल
लोककथा
नाव द थ्री स्पिनर्स
इतर नावे
  • द सेव्हन लिटल पोर्क रिंड्स
  • तीन विणणाऱ्या महिला
माहिती
आर्ने-थॉम्पसन वर्गीकरण प्रणाली ५०१
देश जर्मनी, इटली
मध्ये प्रकाशित ग्रिम्स फेयरी टेल्स
'इटालियन लोककथा

"द थ्री स्पिनर्स" (किंवा द थ्री स्पिनिंग वुमन; जर्मन: Die drei Spinnerinnen ) ही एक जर्मन परीकथा आहे. जी ग्रिम्स फेयरी टेल्स (के एच एम १४) मध्ये ब्रदर्स ग्रिम यांनी संकलित केली आहे.[१] ही कथा आर्ने-थॉम्पसन प्रकार ५०१ मध्ये मोडते. ही कथा संपूर्ण युरोपमध्ये पसरलेली आहे.[२][३]

यात रुम्पेस्टिल्टस्किन आणि फ्राऊ होले यांच्याशी स्पष्ट समांतरता दिसते.[४] आणि काही स्पष्ट फरक आहेत. ज्यामुळे त्यांची अनेकदा तुलना केली जाते.[५]

जिआम्बॅटिस्टा बॅसिलने (एक इटालियन परीकथा साहित्यिक) द सेव्हन लिटल पोर्क रिंड्स नावाने अशीच एक कथा त्याच्या १६३४ च्या पेंटामेरोनच्या कामात समाविष्ट केलेली आहे.[६]

सारांश[संपादन]

एकदा सारा नावाची एक सुंदर पण अतिशय आळशी मुलगी होती. जीला काहीच करायला आवडत नव्हते. तिची आई तिला मारहाण करत असताना तिथून जाणाऱ्या राणीने ते ऐकले आणि त्याचे कारण विचारले. सारा आळशी आहे हे कबूल करायला लाजून ती स्त्री उत्तर देते की सारा इतकी फटाफट अंबाडी कातते की तिला कामात व्यापून ठेवण्यासाठी पुरेसी अंबाडी विकत घेऊ शकत नाही. या उत्तराने प्रभावित झालेल्या राणीने साराला आपल्यासोबत घेऊन जाण्याबद्दल फर्मावले.

राणी मुलीला राजवाड्यातील अंबाडीने भरलेल्या खोलीत घेऊन जाते. ती तिला सांगते कि जर तिने ते सर्व तीन दिवसांत कातून संपवले तर तिचे लग्न राणीच्या सर्वात मोठ्या मुलाशी लावून देण्यात येईल. दोन दिवसांनंतर, राणी परत येते आणि बघते की तिने अंबाडीला स्पर्शही केलेला नाहे. ते पाहूत ती आश्चर्यचकित होते. सारा विनवणी करते की तिला घराची आठवण येत आहे त्यामुळे तिला काम करता येत नाही.

त्या रात्री खोलीत तीन महिला येतात. एकीचा पाय विचित्रपणे सुजलेला असतो. दुसरीचा अंगठा जास्त वाढलेला असतो. तर तिसरीचा ओठ लटकलेला असतो. ते त्या मुलीला तिला तिच्या लग्नासाठी आमंत्रित करण्याची आणि त्यांची मावशी म्हणून ओळख करून देण्याची अट घालतात. सारा त्या अटी मान्य करते. त्या तिघी सर्व अंबाडी कातण्याचे काम पूर्ण करतात.

सकाळी, सर्व अंबाडी सर्व कातलेले पाहून राणी खुश होते. ती तिच्या मुलाच्या, राजकुमाराच्या लग्नाची व्यवस्था करते आणि मुलगी तिच्या "काकूंना" आमंत्रित करण्यास सांगते. त्यांना पाहून राजा विचारतो की त्यांच्यात अशा विकृती कशा आल्या. त्यावर त्या तिघी सांगतात की ते त्यांच्या कातण्याच्या कामामुळे झाले आहे. ते एकुना राजा आपल्या सुंदर सुनेला कातण्यास पुर्णतः मनाई करतो.

  • आळशी स्पिनर
  • तीन काकू
  • रुम्पेस्टिल्टस्किन
  • आई हुलदा

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ashliman, D. L. (2020). "The Three Spinning Women". University of Pittsburgh.
  2. ^ Italo Calvino, Italian Folktales p 716 ISBN 0-15-645489-0
  3. ^ Thompson, Stith. The Folktale. University of California Press. 1977. pp. 48-49. ISBN 0-520-03537-2
  4. ^ The tale is classified as The Spinning Women by the Spring (Thompson. pp. 175 and 182).
  5. ^ Thompson, Stith. The Folktale. University of California Press. 1977. p. 49. ISBN 0-520-03537-2
  6. ^ Jack Zipes, The Great Fairy Tale Tradition: From Straparola and Basile to the Brothers Grimm, p 585, ISBN 0-393-97636-X

बाह्य दुवे[संपादन]